साउथँम्पटन। 2019 क्रिकेट विश्वचषकात आज आठवा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रोज बॉल स्टेडीयमवर होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 227 धावा केल्या आहेत.
या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँडील फेहलुक्वायोला युजवेंद्र चहलला यष्टीचीत केले आहे. तसेच एक खास पराक्रम केला आहे.
फेहलुक्वायो हा धोनीचा यष्टीमागील 33 वी विकेट ठरला आहे. त्यामुळे धोनीने विश्वचषकात यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेण्याच्या यातील तिसरे स्थान मिळवले आहे. तसेच न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक ब्रेंडन मॅक्यूलमला मागे टाकले आहे. मॅक्यूलमने यष्टीमागे विश्वचषकात 32 विकेट्स घेतल्या आहेत.
या यादीत पहिल्या क्रमांकावर 54 विकेटसह कुमार संगकारा आहे. तर दुसऱ्या स्थानावर 52 विकेट्ससह ऍडम गिलख्रिस्ट आहे.
चौथा विश्वचषक खेळणाऱ्या धोनीने आत्तापर्यंत 21 सामन्यात यष्टीमागे 27 झेल घेत आणि 6 यष्टीचीत करत एकूण 33 विकेट्स घेतल्या आहेत.
आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होत असलेल्या सामन्यात भारताकडून चहलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर कुलदीप यादवने 1 विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेकडून ख्रिस मॉरिसने सर्वाधिक 42 धावा केल्या. तसेच फाफ डु प्लेसिस(38), डेव्हिड मिलर(31), फेहलुक्वायो(34) यांनी छोटेखानी खेळी केल्या. पण अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.
विश्वचषकात यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेणारे यष्टीरक्षक –
54 – कुमार संगकारा
52 – ऍडम गिलख्रिस्ट
33 – एमएस धोनी
32 – ब्रेंडन मॅक्यूलम
31 – मार्क बाऊचर
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: रोहित शर्मा, विराट कोहलीने घेतले शानदार झेल, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: इंग्लंड आणि पाकिस्तानच्या या खेळाडूंना झाला दंड, जाणून घ्या कारण
–विश्वचषकातून बाहेर पडलेल्या डेल स्टेनला विराट कोहलीने दिला भावनिक संदेश, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारताचा ११ जणांचा संघ