भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंड संघाला अवघ्या १३४ धावांवर सर्वबाद केले आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करतांना आर. अश्विनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अक्षर पटेल आणि ईशांत शर्मा यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या. तर मोहम्मद सिराज याने १ विकेट आपल्या नावे केला आहे.तसेच दुसऱ्या डावात भारतीय संघाने ५४ धावा करत १ विकेट गमावला आहे. शुबमन गिल अवघ्या ३ धावा करत माघारी परतला. तर रोहित शर्मा (२५ ) आणि चेतेश्वर पुजारा (७) अजूनही मैदानावर खेळत आहेत. भारतीय संघाकडे २४९ धावांची आघाडी आहे.
नकोसा असलेला विक्रम स्टुअर्ट ब्रॉडच्या नावे
इंग्लंड संघाकडून पहिल्या डावात ११ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने कुठल्याही फलंदाजाला नकोसा असलेला असा विक्रम आपल्या नावे केला आहे. इंग्लंड संघाचे ९ गडी बाद झाले असताना, ५९ वे षटक मार्गस्त असताना स्टुअर्ट ब्रॉड फलंदाजीसाठी आला. पण आर. अश्विनच्या चेंडूवर त्रिफळा उडताच स्टुअर्ट ब्रॉड शुन्यावर बाद झाला. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्य धावांवर बाद होणाऱ्या फलंदाजाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे स्टुअर्ट ब्रॉड याला बाद करताच. आर अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २०० वा डाव्या हाताचा फलंदाज बाद केला.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज
५. शेन वॉर्न : फिरकीचा जादूगार म्हटल्या जाणाऱ्या शेन वॉर्न याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ७०८ गडी बाद करण्याचा विक्रम आहे. तसेच नकोसा असलेला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा ५ व्या क्रमांकाचा फलंदाज असा विक्रम देखील आहे. शेन वॉर्न आपल्या कसोटी कारकिर्दीत ३४ वेळा शून्य धावांवर बाद झाला आहे.
४. ग्लेन मॅकग्रा : ऑस्ट्रेलियन संघासाठी ११९३ पासून ते २००७ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या ग्लेन मॅकग्रा याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ३५ वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम आहे.
३. क्रीस मार्टिन: न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज क्रिस मार्टिन याने आपल्या संघासाठी २००० पासून ते २०१३ पर्यंत कसोटी क्रिकेट खेळले. यात त्याने ७१ कसोटी सामने खेळले. मुख्य बाब म्हणजे त्याने फलंदाजी करत असताना पूर्ण कारकिर्दीत अवघे ६१५ चेंडू खेळले. यात तो ५२ वेळेस नाबाद राहिला. परंतु ३६ वेळेस तो शून्यावर बाद झाला आहे. यामुळेच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजाच्या यादीत स्टुअर्ट ब्रॉडसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
२. स्टुअर्ट ब्रॉड : इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट ब्रॉड याच्या नावे टी -२० क्रिकेट मध्ये एका षटकात ६ षटकार खाण्याचा विक्रम आहे. परंतु आता त्याच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम झाला आहे. क्रिस मार्टिन सोबत स्टुअर्ट ब्रॉड आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ( ३६) वेळेस शून्य धावांवर बाद होणाऱ्या फलंदाजाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
१. कोर्टनी वॉल्श: वेस्ट इंडिज संघासाठी १९८४ पासून ते २००१ पर्यंत कसोटी सामने खेळलेल्या, जलद गोलंदाज कोर्टनी वॉल्श याने आपल्या कसोटी कारकिर्दीत १३२ सामने खेळले आहेत. यात त्याने अवघ्या ९३६ धावा केल्या आहेत. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शून्य धावांवर बाद होणाऱ्या फलंदाजाच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तो आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण ४३ वेळेस शून्य धावांवर बाद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ पंतचा ‘तो’ षटकार पाहून कर्णधार विराट कोहलीही झाला अवाक्, पाहा व्हिडिओ
Valentines Day Special : ३ मुलींवर जडला होता जाॅंटी रोड्सचा जीव, जिच्याशी लग्न केले ती होती…