आयपीएल फ्रँचायझी राजस्थान राॅयल्सने यावर्षी आयपीएलच्या लिलावात आतापर्यंतची सर्वात मोठी बोली लावली होती आणि दक्षिण अफ्रिकेच्या क्रिस मॉरिसला त्यांच्या संघात सामील केले होते. आता आयपीएलचा चालू हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे आणि क्रिस मॉरिस राजस्थानसाठी खूप महागात पडल्याचेही स्पष्ट झाले आहे. मॉरिसने हंगामात राजस्थान संघासाठी, जे विकेट्स घेतले आहेत संघाला त्यासाठी कोटी रुपयांची किंमत मोजावी लागली आहे. तसेच त्याने केलेली एक धाव संघाला लाखो रुपयांना पडली आहे.
राजस्थानने क्रिस मॉरिससाठी आयपीएल २०२१ च्या लिलावात १६.२५ कोटी रुपये दिले आहेत. क्रिस मॉरिसने या हंगामात ११ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ९.१७ च्या इकोनॉमी रेटने आणि २५.०६ च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजीमध्ये त्याने १३.४० च्या सरासरीने केवळ ६७ धावा केल्या आहेत. आकड्यांचा हिशोब केला तर संघाला त्याने घेतलेली एक विकेट १.०३ कोटी रुपयांना पडली आहे. तसेच त्याने केलली एक धाव २४.२५ लाख रुपयांना पडली आहे.
सुनील गावसकरांनीही केली मॉरिसवर टीका
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी क्रिसच्या खराब प्रदर्शनामुळे त्याच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “जेव्हा राजस्थान रॉयल्सने क्रिस मॉरिसला विकत घेतले होते, तेव्हा त्याच्याकडून खूप आशा होती. मला हे माहीत आहे की, अपेक्षांना पात्र ठरणे नेहमी शक्य नसते. हा असा खेळाडू आहे, जो शब्द देतो, पण खूप कमी वेळा तो शब्द पूर्ण करतो. ही फक्त आयपीएलची गोष्ट नाहीये, तो दक्षिण अफ्रिकेसाठीही खेळत होता; तेव्हाही त्याच्याकडू खूप अपेक्षा ठेवल्या गेल्या, पण तो त्याप्रमाणे खेळू शकला नाही.”
क्रिस हंगामात राजस्थानला अपेक्षित योगदान देऊ शकला नाही. परिणामी राजस्थान संघला प्लेऑफमध्ये पोहोचता आले नाही. राजस्थानने हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांपैकी ५ सामन्यात विजय मिळवला आणि १० गुणांसह संघ गुणतालीकेत सातव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंचांचा ‘तो’ निर्णय मुंबईच्या बाजूने लागला आणि बुमराहच्या पत्नीची लक्षवेधी रिऍक्शन, व्हिडिओ व्हायरल
मुंबई इंडियन्सविरुद्ध का खेळला नाही विलियम्सन? प्रभावी कर्णधार पांडेने सांगितले कारण
गाडी क्रमांक १५५२…! विजयानंतरही मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून ‘आऊट’, चाहत्यांकडून मीम्सचा वर्षाव