रविवारी (दि. 29 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेचा अंतिम सामना नोवाक जोकोविच आणि स्टिफानोस त्सित्सिपास यांच्यात पार पडला. या सामन्यात जोकोविचने मैदान मारत 6-3, 7-4,7-6 अशा सरळ सेटमध्ये त्सित्सिपासला पराभूत केले. विशेष म्हणजे, जोकोविचचे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे हे दहावे विजेतेपद होते. यापूर्वी त्याने 9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अंतिम सामन्यात धडक देत विजेतेपदावर नाव कोरले होते. दहावे विजेतेपद मिळवताच जोकोविचने एकासोबत अनेक विक्रमांना गवसणी घातली. अशात ओपन एरामध्ये एकेरी स्पर्धेत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या खेळाडू कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया…
सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेते टेनिसपटू
आतापर्यंत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा मान अमेरिकेची माजी टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) हिच्या नावावर आहे. सेरेनाने महिला एकेरीत सर्वाधिक 23 ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या जर्मनीची स्टेफी ग्राफ (Steffi Graf), स्पेनचा राफेल नदाल (Rafael Nadal) आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच (Novak Djokovic) आहेत. त्यांनी प्रत्येकी 22 वेळा एकेरी स्पर्धेत ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.
35 is the new 25 🍷 pic.twitter.com/hMFmryRaSO
— #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2023
That jacket 👌@DjokerNole • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/7w8c9t0NWp
— #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2023
यानंतर तिसऱ्या स्थानी स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर (Roger Federer) आहे. त्याने 20 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपदं जिंकली आहेत. त्यानंतर संयुक्तरीत्या चौथ्या स्थानी ख्रिस इव्हर्ट आणि मार्टिना नावरॅतिलोवा हे आहेत. त्यांनी प्रत्येकी 18 वेळा ग्रँडस्लॅमची विजेतीपदं जिंकली आहेत. पाचव्या स्थानी अमेरिकेचे पीट सॅम्प्रास आहेत. त्यांच्या नावावर 14 ग्रँडस्लॅम विजेतीपदं आहेत. याव्यतिरिक्त संयुक्तरीत्या सहाव्या स्थानी मार्गारेट कोर्ट आणि ब्योर्न बोर्ग हे असून त्यांनी प्रत्येकी 11 वेळा ग्रँडस्लॅमची ट्रॉफी उंचावली आहे.
विशेष म्हणजे, मार्गारेट कोर्ट हिने एकूण 24 ग्रँडस्लॅम विजेतीपदं जिंकली आहेत. यातील 13 ग्रँडस्लॅम विजेतीपदं ही प्री-ओपन एरामध्ये जिंकली होती. (Most Grand Slam tennis singles titles winner list)
सर्वाधिक ग्रँडस्लॅम टेनिस एकेरी विजेतीपदं जिंकणारे खेळाडू (ओपन एरा)
23 वेळा- सेरेना विल्यम्स
22 वेळा- स्टेफी ग्राफ/राफेल नदाल/नोवाक जोकोविच*
20 वेळा- रॉजर फेडरर
18 वेळा- ख्रिस इव्हर्ट/मार्टिना नावरॅतिलोवा
14 वेळा- पीट सॅम्प्रास
11 वेळा- मार्गारेट कोर्ट/ब्योर्न बोर्ग
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: ऑस्ट्रेलियन ओपनवर जोकोविचचेच राज्य! तब्बल दहाव्यांदा उंचावली ट्रॉफी
‘हे’ आहेत आतापर्यंत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे धुरंधर, जोकोविच यादीत सर्वात अव्वल