हैद्राबाद | विश्वचषक २०१९ पुर्वी भारतीय संघ शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्यापासून हैद्राबाद येथे होणार आहे. या हैद्राबादच्या मैदानावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ सामने खेळला असून या दोनही सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
या मैदानावर उद्या रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३२३ वा सामना खेळणार आहे. या सामन्यात रोहितला षटकारांचा एक खास विक्रम करण्याची संधी आहे. त्याने जर या सामन्यात ३ षटकार मारले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंची यादीत तो चौथ्या स्थानी येऊ शकतो.
सध्या रोहितच्या नावावर ३२२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३४९ षटकार आहेत. तर चौथ्या स्थानी एमएस धोनी (३५२) आणि सनथ जयसुर्या (३५२) हे खेळाडू आहेत.
रोहितला हा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. ख्रिस गेल या यादीत ५०६ षटकारांसह अव्वल स्थानी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. हा विक्रम त्याने इंग्लंडविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
५०६- ख्रिस गेल
४७६- शाहिद आफ्रिदी
३९८- ब्रेंडन मॅक्क्युलम
३५२- एमएस धोनी
३५२- सनथ जयसुर्या
३४८- रोहित शर्मा#म #मराठी #RohitSharma pic.twitter.com/X0rJHsvqEX— Sharad Bodage (@SharadBodage) March 1, 2019