---Advertisement---

कोणते संघ किती वेळा गेले आहेत आयपीएल फायनलमध्ये

On: शनिवार, मे 26, 2018 8:36 AM
---Advertisement---

कोलकाता। शुक्रवारी झालेल्या आयपीएल 2018च्या क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैद्राबादने कोलकाता नाईट रायडर्सवर 14 धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.

त्यामुळे अंतिम सामन्यात त्यांचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. हैद्राबाद आणि चेन्नई हे दोन संघ यावर्षीच्या आयपीएलमध्ये गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या दोन स्थानावर होते. त्यामुळे आता या दोन अव्वल संघांमध्ये आयपीएल 2018 चा अंतिम सामना पाहायला मिळणार आहे.

साखळी फेरीनंतर गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असणाऱ्या संघांमध्ये अंतिम सामना होण्याची ही आयपीएल इतिहासातील सहावी वेळ आहे.

हैद्राबादची ही दुसरी अंतिम फेरी आहे. त्यांनी यापुर्वी २०१६ला अंतिम फेरी गाठत विजेतेपद मिळवलं होतं.

परावा चेन्नईने ७व्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी ६ पैकी त्यांनी २ वेळा विजेतेपदं मिळवली आहे.

मुंबई इंडियन्सने ४ वेळा अंतिम फेरी गाठली असुन ३ वेळा विजेतेपदं मिळवली आहे तर कोलकाताने २ वेळा अंतिम फेरी गाठताना दोन्ही वेळा विजेतेपदं मिळवली आहेत.

बेंगलोरने ३ वेळा अंतिम फेरी गाठली असुन एकदाही विजेतेपदं मिळवता आलं नाही. राजस्थान, डेक्कन, पंजाब, पुणे संघाने एकदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यात राजस्थानने एकदा तसेच डेक्कनने एकदा विजेतेपदं मिळवलं आहे.

अंतिम फेरीत जाऊन एकदाही विजेतेपदं मिळवता न येणाऱ्या संघात पुणे, पंजाब आणि बेंगलोर संघाचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जे आयपीएल २०१७मध्ये झालं तेच २०१८मध्ये होणार का?

बापरे! कालच्या सामन्यानंतर एवढं कौतुक आलं राशीदच्या वाट्याला

अखेर आयपीएलला मिळाला दुसरा सुपरमॅन, केला असा काही कारनामा की ऐकतच रहाल!

ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज

आयपीएलमध्ये सहाव्यांदा झाला असा कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment