पुणे। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात रविवारी (१ मे) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना पार पडला. हा सामना चेन्नईने १३ धावांनी जिंकून हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली. चेन्नईच्या या विजयात ऋतुराज गायकवाड याने मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याने सामनावीर पुरस्कारही जिंकला. त्यामुळे त्याने एक विक्रम केला आहे.
ऋतुराज गायकवाडची चमकदार कामगिरी
चेन्नईने (CSK) या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. चेन्नईकडून (Chennai Super Kings) सलामीला फलंदाजीला आलेल्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) ५७ चेंडूत ९९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारले. याबरोबरच त्याने डेवॉन कॉनवेबरोबर १८२ धावांची सलामी भागीदारी केली. त्यामुळे चेन्नईला २०२ धावांचा डोंगर उभारता आला. तसेच ऋतुराजला त्याच्या या कामगिरीमुळे सामनावीर पुरस्कारही मिळाला.
त्यामुळे ऋतुराज आता आयपीएलमध्ये चेन्नईकडून सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये आला आहे. त्याची चेन्नईकडून सामनावीर पुरस्कार जिंकण्याची ही आठवी वेळ होती. त्यामुळे तो चेन्नईकडून सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आला आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर एमएस धोनी आहे. त्याने १५ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. तसेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर १२ सामनावीर पुरस्कारांसह सुरेश रैना असून तिसऱ्या क्रमांकावर रविंद्र जडेजा आहे. जडेजाने ११ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. त्याचबरोबर मायकल हसीने १० वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.
चेन्नईने जिंकला सामना
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद २०२ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून ऋतुराजव्यतिरिक्त डेवॉन कॉनवेने ८५ धावांची खेळी केली. सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजनने २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला २० षटकांत ६ बाद १८९ धावाच करता आल्या. हैदराबादकडून निकोलस पूरनने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तसेच केन विलियम्सनने ४७ धावांची खेळी केली. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
मार्शची प्रामाणिकता दिल्लीला पडली महागात अन् गमावला सामना? वाचा नक्की काय झालं
बापरे! २९ वर्षांपुर्वी चालू सामन्यातच खेळाडूवर झाला होता चाकूने हल्ला, पुढे…