भारत विरुद्ध पाकिस्तान संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील चौथा महामुकाबला रविवारी (दि. 23 ऑक्टोबर) पार पडला. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाद विक्रम केला. विशेष म्हणजे, त्याने या विक्रमात युवराज सिंग आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांनाही मागे टाकले. चला तर काय आहे तो पराक्रम पाहूया…
झाले असे की, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात झालेली नाणेफेक कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने जिंकली. तसेच, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यासह त्याने मैदानात पाऊल टाकताच खास विक्रम आपल्या नावावर केला. रोहित टी20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला. त्याचा विश्वचषकातील हा 34 वा सामना होता. यामुळे रोहितने युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांचा विक्रम मोडला.
यापूर्वी टी20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम एमएस धोनी याच्या नावावर होता. धोनीने एकूण 33 सामने खेळले होते. तसेच, युवराज सिंग याने टी20 विश्वचषकात भारताकडून 31 सामने खेळले होते. मात्र, या दोघांनाही रोहितने मागे टाकले. आता रोहित टी20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला.
टी20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
34 सामने- रोहित शर्मा*
33 सामने- एमएस धोनी
31 सामने- युवराज सिंग
याव्यतिरिक्त रोहितने आणखी एक खास कारनामा केला. रोहित एमएस धोनी आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यानंतर टी20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा तिसरा खेळाडू बनला. धोनीने 2007 ते 2016 यादरम्यान भारतीय संघाचे टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्व केले होते. त्यानंतर विराट कोहली याने 2021च्या टी20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले होते. यानंतर आता रोहित शर्मा 2022च्या विश्वचषकात भारताचे नेतृत्व करत आहे.
टी20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करणारे खेळाडू
2007 ते 2016- एमएस धोनी
2021- विराट कोहली
2022- रोहित शर्मा*
भारतीय संघाने 15 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007च्या पहिल्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले होते. आता या विश्वचषकात रोहित शर्मा टी20 विश्वचषकाच्या विजेतेपदाचा मान मिळवून देतो का, हे पाहणे महत्त्वाचा ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे भारतीय दोनच, एक अर्शदीप तर दुसरा….
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, यष्टीरक्षक म्हणून डीकेची संघात एन्ट्री; पाहा प्लेइंग इलेव्हन