---Advertisement---

जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड

MS-Dhoni
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी याने आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला आहे. गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाऊल ठेवताच धोनीच्या नावावर आतापर्यंत कुणालाही न जमलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे. चला तर जाणून घेऊयात धोनीने नेमका कोणता विक्रम केला आहे…

धोनीचा खतरनाक विक्रम
रविवारी (दि. 28 मे) गुजरात विरुद्ध चेन्नई (Gujarat vs Chennai) संघात होणारा आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (दि. 29 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जात आहे. या सामन्यात एमएस धोनी (MS Dhoni) याने नाणेफेकीसाठी मैदानावर पाऊल ठेवताच खास विक्रम रचला. धोनी त्याचा आयपीएल कारकीर्दीतील 250वा सामना खेळत आहे. यासह तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला. धोनीने चेन्नईकडून 250 सामने खेळताना 39.09च्या सरासरीने तब्बल 5082 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 24 अर्धशतके झळकावली आहेत.

धोनीव्यतिरिक्त सर्वाधिक सामने खेळणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. रोहितने आतापर्यंत कारकीर्दीत 243 आयपीएल सामने खेळले आहेत. यादीतील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू दिनेश कार्तिक आहे. त्याने आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत 242 सामने खेळले आहेत. तसेच, चौथ्या क्रमांकाचा खेळाडू विराट कोहली असून त्याने आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत 237 सामने खेळले आहेत. यादीत पाचव्या क्रमांकावर पुन्हा चेन्नई सुपर किंग्स संघाचा खेळाडू रवींद्र जडेजा आहे. जडेजा गुजरातविरुद्ध त्याचा 226वा आयपीएल सामना खेळत आहे.

आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू
250 सामने- एमएस धोनी
*
243 सामने- रोहित शर्मा
242 सामने- दिनेश कार्तिक
237 सामने- विराट कोहली
226 सामने- रवींद्र जडेजा

गुजरात संघाचा पाच षटकांपर्यंतचा डाव
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, गुजरात टायटन्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी गुजरातकडून डावाची सुरुवात करण्यासाठी शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा मैदानावर आले होते. यावेळी पाच षटकांचा खेळ संपेपर्यंत गुजरातने एकही विकेट न गमावता 49 धावा केल्या. यामध्ये साहाने 16 चेंडूत 24 आणि गिलने 13 चेंडूत 24 धावा केल्या होत्या. (Most matches in Indian Premier League history MS Dhoni Created History)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा
भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूसाठी पुढील 6 ते 8 महिने खूपच महत्त्वाचे, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---