वनडे क्रिकेट म्हटलं की विक्रम हे ओघानेच येतात. यातील अनेक विक्रम असेही असतात की ज्याचा आपण विचारही केलेला नसतो.
या लेखात आपण अशा विक्रमावर चर्चा करणार आहोत ज्यात खेळाडू वनडेत सलग सर्वाधिक सामन्यात ० धावेवर बाद झाला नाही.
अनेक क्रिकेटप्रेमींना राहुल द्रविडची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी माहित आहे. परंतु द्रविड वनडेतही तेवढाच चांगला खेळला हे फारच कमी चाहत्यांना माहित असतं. द्रविडने वनडे ३०० पेक्षा जास्त सामने व १० हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
हाच द्रविड वनडेत सगल १२० डावांत एकदाही शुन्य धावेवर बाद झाला नाही. हा विक्रम आजही त्याच्या नावावर आहे. (Players With Most Consecutive ODI innings without a Duck)
वनडेत सर्वाधिक डावात (सलग) शुन्य धावेवर बाद न होणारे फलंदाज
१२०- राहुल द्रविड, २९ ऑगस्ट १९९९ ते ६ फेब्रुवारी २००४
११९- मार्टिन क्रो, २२ फेब्रुवारी १९८४ ते २८ मार्च १९९३
१०५- केप्लर वेसल्स, ९ जानेवारी १९८३ ते निवृत्तीच्या शेवटच्या सामन्यापर्यंत (२८ ऑक्टो १९९४)
९६- जावेद मियाॅंदाद, ३० डिसेंबर १९८६ ते ३० डिसेंबर १९९२
९२- सर रिची रिचर्डसन, १३ नोव्हेंबर १९९० ते निवृत्तीच्या शेवटच्या सामन्यापर्यंत १४ मार्च १९९६
९२- मोहम्मद युसुफ, ५ एप्रिल २००५ ते निवृत्तीच्या शेवटच्या सामन्यापर्यंत ८ नोव्हेंबर २०१०
९०- एबी डिव्हिलीयर्स, १ जुलै २००७ ते १४ जुन २०१३
ट्रेडिंग घडामोडी-
–जर आयपीएल झाली नाही तर या ३ खेळाडूंचा विश्वचषकातील पत्ता होणार कट
एकाच दिवशी पदार्पण केलेल्या जोड्या, एकाने केले पुढे मोठे नाव तर दुसरा राहिला खूपच मागे
चौथ्या क्रमांकासाठी भारताकडे आहेत तब्बल १२ पर्याय उपलब्ध, ३ नावं आहेत मराठी
आयपीएलमध्ये चेन्नईला हा संघ कायमच नडतो, तब्बल १७ पराभव आलेत सीएसकेच्या नशीबात