---Advertisement---

मोहम्मद शमीचा जबरदस्त विक्रम; कुंबळ, श्रीनाथची केली बरोबरी

---Advertisement---

बंगळुरु। आज(19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 289 धावा केल्या आहेत.

तसेच भारताकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहे. त्याचबरोबर शमीने एक खास पराक्रमही केला आहे. त्याने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 63 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

शमीची ही वनडेमध्ये एका सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची 10 वेळ आहे. त्यामुळे सर्वाधिक वेळा वनडेत 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत त्याने अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांची बरोबरी केली आहे.

कुंबळे आणि श्रीनाथ यांनीही प्रत्येकी 10 वेळा वनडेत 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर अजित अगरकर आहे. अगरकरने 12 वेळा हा कारनामा केला आहे.

वनडेत सर्वाधिक वेळा 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –

12 वेळा – अजित अगरकर

10 वेळा – मोहम्मद शमी

10 वेळा – अनिल कुंबळे

10 वेळा – जवागल श्रीनाथ

8 वेळा – जहिर खान

8 वेळा – रविंद्र जडेजा

https://twitter.com/Maha_Sports/status/1218886924313624576

https://twitter.com/Maha_Sports/status/1218869514135228416

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---