मँचेस्टर। 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात आज(16 जून) 22 वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सुरु आहे. ओल्ड ट्रॅफर्डवर होणाऱ्या या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.
धोनीचा हा भारतासाठी 341 वा वनडे सामना आहे. त्यामुळे धोनी भारताकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणारा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू ठरला आहे. याबरोबरच त्याने या यादीत भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडला मागे टाकले आहे. द्रविडने भारताकडून 340 वनडे सामने खेळले आहेत.
या यादीत अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने भारताकडून 463 वनडे सामने खेळले आहेत.
धोनीने त्याच्या वनडे कारकिर्दीत आत्तापर्यत 344 सामने खेळले आहेत. पण यातील 3 सामने त्याने आशिया एकादश संघाकडून खेळले आहेत. तसेच 341 सामने भारताकडून खेळले आहेत.
आजच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणारे क्रिकेटपटू –
463 सामने – सचिन तेंडुलकर
341 सामने – एमएस धोनी
340 सामने – राहुल द्रविड
334 सामने – मोहम्मद अझरुद्दीन
308 सामने – सौरव गांगुली
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: आजच्या सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
–विश्वचषक २०१९: किंग कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचण्याची आज सुवर्णसंधी
–वॉर्नरने त्याच्यामुळे दुखापतग्रस्त झालेल्या या गोलंदाजाला दिली खास भेट, पहा व्हिडिओ