इंग्लंडचा संघ 17 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत 3 कसोटी सामने खेळले जाणार असून या मालिकेची सुरुवात रावळपिंडीमधून होणार आहेे. मात्र, पाकिस्तान क्रिकेेट बोर्डाने स्पष्ट सांगितले आहे की, मालिका वेेळेवर सुरु होण्याची संभाव्यता फार कमी आहेे. पाकिस्तानमध्येे कसोटी सामने खेळण्यासाठी आलेले इंग्लंडचे खेळाडू आजारी पडले आहेत. याचा परिणाम मालिकेवरही पडू शकतो असेही मानले जात आहे. अशातच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या आयोजनावर प्रश्न निर्माण केले जात आहेेत.
इंग्लंडच्या खेळाडूंची प्रकृती सध्या बरी आहेे. आतापर्यंत हे स्पष्ट नाहीये की त्यांना नेमके काय झाले, पण हे नक्की सांगण्यात येतय की या खेळाडूंना एखाद्या संसर्गजन्य रोगाचे संक्रमण झालेे असेल. संक्रमित झालेल्या खेळाडूंमध्ये बेन स्टोक्स (Ben Stokes) याचा देखील समावेश आहे. संघाची परिस्थिती गंभीर आहे. यामुळे पहिल्या दिवसाच्या सराव सत्रात फक्त 5 खेळाडू आले होते. या खेळाडूंमध्ये हॅरी ब्रुक (Harry Brook) , जॅक क्रॉले (Jack Crawley) , कीटन जेनिंग्ज (Keaton Jennings), ओली पोप (Ollie Pope) आणि जो रुट (Joe Root) यांचा समावेश होता.
रावळपिंडी कसोटी सामना पुढे ढकलला जाऊ शकतो
इंग्लंड क्रिकेट बोर्डाला आपल्या खेळाडूंना अडचणीत टाकायचे नाहीयेे. त्यामुळे रावळपिंडी कसोटी सामना पुढे ढकलण्याची चर्चा सुरु आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत म्हणाले की, ” पाहुण्या संघाचे खेळाडू संसर्गजन्य रोगामुळे आजारी असल्याने रावळपिंडी येथे खेळवला जाणारा सामना पुढे ढकलण्याची चर्चा पीसीबी आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यात सुरु आहे. पीसीबी खेळाडूंच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही याविषयी माहिती वेळोवेळी देत राहू.”
इंग्लंड संघाकडून खेळाडूंच्या स्वास्थ्याबाबत ठोस माहिती समोर येऊ शकली नाही
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्रॉफीचे अनावरण इंग्लंडचा कर्णधार आजारी असल्याने एक दिवस पुढे ढकलण्यात आलेले, जे आता सुरुवातीचा सामना खेळवण्याच्या आधी नाणेफेकीच्यावेळी केले जाईल. संघाच्या प्रवक्त्यांनी अद्याप किती खेळाडू अस्वस्थ आहेेत, त्यांना कोणता आजार झालाय अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्या खेळाडूंना आरामासाठी हॉटेलमध्ये थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजा कुटुंबात पडले दोन गट! पत्नी भाजपची उमेदवार असताना वडील आणि बहिणीकडून काँग्रेसचा प्रचार
पावसाच्या व्यत्ययाने तिसरी वनडे रद्द! 1-0 ने मालिका यजमान न्यूझीलंडच्या नावे





