क्रिकेटची लोकप्रियता जगभारात आहे. त्यातरी भारतात या खेळाची आवड इतरांच्या तुलनेत जास्तच आहे. भारतात क्रिकेट संघाला पाठिंबा देणारे चाहते देखील इतर देशांच्या तुलनेत कैक पटींनी जास्त आहेत. भारतात जन्मलेल्या प्रत्येक लहान मुलाने एकदा तरी देशासाठी क्रिकेट खेळण्याचे सप्न पाहिलेले असते. पण यातील काही मोजक्याच लोकांना हे स्वप्न सत्यात उतरवता येते. याचाच परिणाम यूएसएच्या महिला क्रिकेट (USA U19 Women’s Team) संघावर झाल्याचे दिसून येत आहे.
भारतात असेलली क्रिकेटची लोकप्रियता पाहता, देशासाठी क्रिकेट खेळण्याची संधी अनेक इच्छुकांना मिळत नाही. असे अनेकजण आहेत, ज्यांनी भारतीय संघात संधी मिळत नसल्यामुळे देश बदलला आणि दुसऱ्या देशांकडून क्रिकेट खेळू लागले. पूर्वी महिला क्रिकेटला पुरुषांच्या तुलनेत कमी प्रसिद्धी मिळत होती. अशात उच्छुक महिला खेळाडूंपैकी बहुतांश खेळाडूंना मोठ्या पातळीवर खेळण्याची संधी देखील मिळत होती. मात्र, अलीकडच्या काळात महिला क्रिकेटची लोकप्रियता देखील वाढत आहे आणि खेळाडूंना देशासाठी आणि देशांतर्गत क्रिकटेमध्ये संधी मिळणेही कठीण होऊन बसले आहे.
📡MEDIA RELEASE: USA Cricket Women's U19s Squad for Historic First World Cup Appearance Named
15-player squad to represent Team USA is named for the inaugural ICC Under-19 Women’s T20 World Cup in South Africa next month
➡️: https://t.co/xB789FYppc#WeAreUSACricket🇺🇸 #U19CWC pic.twitter.com/x6Y00UXrE7
— USA Cricket (@usacricket) December 14, 2022
येत्या काळात 19 वर्षांखालील महिला विश्वचषक खेळवला जाणार असल्याचेही आयसीसीने जाहीर केले आहे. याच कारणास्तव जगभरातील संघ त्यांचा 19 वर्षाखालील महिला संघ तयार करत आहेत. याच यादीत अमेरिकेने त्यांच्या 19 वर्षांखाली महिला संघाची घोषणा केली. यूएसए क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा संघ घोषित केला गेला आहे. पण त्यांच्या संघातील खेळाडू पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. संघातील बहुतांश खेळाडू भारतीय वंशाच्या आहेत.
Bhai ise India B team kyu ni bolte ye.
— Krishna Kant Mishra (@bareillysekk) December 15, 2022
United States of India
— Rahul A Goyal (@rahulgoyalactor) December 14, 2022
19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय वंशाच्या खेळाडूंनी भरलेला संघ घोषित करताच सोशल मीडियावर याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेकजण या संघाला भारताचा ब संघ म्हणत आहेत. तर काही जण ‘युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया’, असा या संघाचा उल्लेख करत आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स आणि प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.