---Advertisement---

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 3 विकेट्सनंतर भारताने जोडल्या ‘एवढ्या’ धावा अन् रचला विक्रम, नजर तर टाकाच

Virat-Kohli-And-Hardik-Pandya
---Advertisement---

मागील वर्षी म्हणजेच 2021च्या टी20 विश्वचषकामध्ये पाकिस्तान संघाने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले होते. याचा बदला भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022च्या आपल्या पहिल्याच सामन्यात घेतला. भारताने हा सामना 4 विकेट्सने जिंकत विश्वचषकात विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारताने वेगळाच कारनामा केला. चला तर काय होता तो कारनामा जाणून घेऊया…

सामन्याचा आढावा
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावत 159 धावा चोपल्या. पाकिस्तानचे 160 धावांचे आव्हान 6 विकेट्स गमावत शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. या विजयात विराट कोहली (Virat Kohli) याने मोलाचा वाटा उचलला. त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, या विजयासह भारताने एक कारनामाही केला. तो असा की, भारताने या सामन्यात आतापर्यंतच्या टी20 क्रिकेटमधील विजयी सामन्यांच्या तुलनेत 3 विकेट्स गमावल्यानंतर सर्वाधिक धावा जोडल्या.

भारताचा कारनामा
म्हणजेच, जेव्हा भारतीय संघाने 3 विकेट्स गमावल्या, तेव्हा संघाची धावसंख्या 26 इतकी होती. मात्र, त्यानंतर भारताने एकूण 134 धावा जोडल्या आणि सामना जिंकला. यापूर्वी भारताने 2022मध्येच राजकोट येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना 3 विकेट्सनंतर 129 धावा जोडल्या होत्या. 2016मध्ये ढाका येथे बांगलादेशविरुद्ध खेळतानाही भारताने ही कामगिरी केली होती. त्यावेळी भारताने 3 विकेट्स गमावल्यानंतर 124 धावा जोडल्या होत्या. त्याआधी 2013मध्ये राजकोट येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 122 आणि 2007मध्ये डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 विकेट्स गमावल्यानंतर 120 धावा जोडल्या होत्या.

टी20 क्रिकेट सामना जिंकण्यासाठी 3 विकेट्स गमावल्यानंतर भारताने जोडलेल्या सर्वाधिक धावा
134 धावा- विरुद्ध- पाकिस्तान मेलबर्न, (2022)*

129 धावा- विरुद्ध- दक्षिण आफ्रिका, राजकोट (2022)
124 धावा- विरुद्ध- बांगलादेश, ढाका, (2016)
122 धावा- विरुद्ध- ऑस्ट्रेलिया, राजकोट, (2013)
120 धावा- विरुद्ध-  दक्षिण आफ्रिका, डर्बन, (2007)

भारताचा डाव
भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहली याने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्याने या धावा करताना 4 षटकार आणि 6 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या यानेही 40 धावांचे योगदान दिले. यामध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला 2 आकडी धावसंख्या पार करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा फक्त 4 धावांवर तंबूत परतला. मात्र, विराट आणि पंड्या यांनी भारताचा घसरता आलेख सावरला आणि संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यावेळी पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना हॅरिस रौफ याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच, नसीम शाह आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs PAK | खास यादीत पहिल्या चार क्रमांकांवर विराट कोहलीच, रोहित शर्माचा नंबर पाचवा
पाकिस्तान भिडतो तेव्हा कोहलीच नडतो! पाच विश्वचषकात एकट्या विराटने लढवलाय किल्ला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---