हेमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(31 जानेवारी) चौथा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला योग्य ठरवत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाचा डाव 30.5 षटकात 92 धावांवर रोखला आहे.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची धूरा संभाळत असलेला रोहित शर्माचा हा सामना वनडे कारकिर्दीतील 200 वा सामना आहे. मात्र त्याला या सामन्यात खास काही करता आले नाही. तो 23 चेंडूत 7 धावा करुन बाद झाला.
पण तरीही त्याने एक खास विक्रम केला आहे. तो 200 वनडे सामन्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे.
रोहितने 200 वनडे सामन्यात 22 शतके आणि 39 अर्धशतकांच्या सहाय्याने 47.88 च्या सरासरीने 7806 धावा केल्या आहेत.
रोहित हा 200 वनडे खेळणारा भारताचा एकूण 14 वा तर जगातील 79 वा खेळाडू ठरला आहे.
200 वनडे सामन्यांनंतर सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
8888 – विराट कोहली
8621 – एबी डिविलियर्स
7806 – रोहित शर्मा
7747 – सौरव गांगुली
7445 – देसमंड हाइन्स
7370 – ब्रायन लारा
7305 – सचिन तेंडुलकर
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी नसता तर रोहित कधीच एवढा मोठा खेळाडू होऊ शकला नसता
–अशी सुवर्णसंधी रोहित शर्माला पुन्हा कधीही मिळणार नाही
–५२ वर्षांत जे घडले नाही ते रोहित सेनेला न्यूझीलंडमध्ये करण्याची संधी