---Advertisement---

लहान वय असले तरी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना घाम फोडणारे युवा फलंदाज, दोन आहेत भारतीय 

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 10:39 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनच्या मैदानावर चालू असलेला चौथा कसोटी सामना अतिशय रोमांचक घडीवर आला आहे. ३२८ धावांचे भलेमोठे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. पॅट कमिन्सने यष्टीरक्षक टीम पेनच्या हातून अवघ्या ७ धावांवर त्याला झेलबाद केले. त्यानंतर फिरकीपटू नॅथन लायननेही शुबमन गिलची विकेट काढत संघाला दुसरे यश मिळवून दिले. परंतु गिलने जाण्यापुर्वी जबरदस्त फलंदाजी करत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

अवघ्या ९ धावांनी हुकले गिलचे शतक 

२१ वर्षीय गिलने पाचव्या दिवसाच्या (१९ जानेवारी) पहिल्या सत्रापासून बचावात्मक पण आक्रमक फलंदाजी केली. ६२.३३च्या स्ट्राईक रेटने २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ९१ धावांची आतिशी खेळी त्याने केली. या खेळीसाठी त्याने १४६ चेंडू खेळले. अखेर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन याने स्टिव्ह स्मिथच्या हातून त्याला झेलबाद केले. त्यामुळे अवघ्या ९ धावांनी गिलचे पहिले कसोटी हुकले.

कसोटी मालिकेत गिलच्या २५० हून अधिक धावा

असे असले तरी, वर्ष २००० पासून २२ पेक्षा कमी वय असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिलने चौथे स्थान पटकावले आहे. मेलबर्न येथे झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याद्वारे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मेलबर्न कसोटी आणि पुढील सिडनी कसोटीत एका अर्धशतकासह त्याने एकूण १६१ धावा केल्या.

त्यानंतर द गॅबा स्टेडियमवर चालू असलेल्या ब्रिस्बेन कसोटीच्या दोन्ही डावात मिळून ९८ धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ कसोटी सामन्यात मिळून त्याने २५९ धावा खात्यात जमा करत हा किर्तीमान मिळवला आहे.

गिलव्यतिरिक्त या फलंदाजांनी केलाय हा विक्रम

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत या विक्रमाच्या यादीत अव्वलस्थानी आहे. त्याने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळून सर्वाधिक ३५० धावा केल्या होत्या. तर इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज बेन स्टोक्स आणि माजी दिग्गज ऍलिस्टर कूक यांनीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला आहे. स्टोक्सने २०१३-१४ मध्ये २७९ धावा केल्या होत्या. तर कूकने २००६-०७ मध्ये २७६ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : शुभमन गिलचं शतक थोडक्यात हुकलं, ९१ धावांवर बाद; भारताला अद्याप १९६ धावांची गरज

क्या सोचा था, क्या हो गया..! रिव्ह्यू चुकल्यानंतर ऑसींनी धरलं डोकं, पाहा तो मजेदार क्षण

शुभमन गिलच्या जबरा फलंदाजीचा लाल रुमालाशी आहे संबंध, घ्या जाणून 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---