---Advertisement---

अखेर कर्णधार कोहली ठरला नंबर वन; ‘कॅप्टनकूल’ धोनीचा विक्रम मोडलाच!!

---Advertisement---

हॅमिल्टन। आज(29 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना सेडन पार्क येथे होत आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या आहेत. तसेच आज भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 27 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 38 धावांची छोटेखानी खेळी केली. याबरोबरच एक खास विक्रम केला आहे.

विराटच्या आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कर्णधार म्हणून 36 सामन्यात 45.04 च्या सरासरीने 1126 धावा झाल्या आहेत.  त्यामुळे तो आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

धोनीने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कर्णधार म्हणून 72 सामन्यात 37.06 च्या सरासरीने 1112 धावा केल्या आहेत.

तसेच सध्या आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नावावर आहे. त्याने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1273 धावा केल्या आहेत.

तर दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आहे. त्याच्या आजचा सामना खेळण्याआधी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कर्णधार म्हणून 41 सामन्यात 31.02 च्या सरासरीने 1148 धावा होत्या. आज त्याला त्याच्या आणि अव्वल क्रमांकावर असणाऱ्या डू प्लेसिसमधील धावांचे अंतर कमी करण्याची संधी आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू-

1273 – फाफ डू प्लेसिस (40 सामने)

1148 – केन विलियम्सन (41 सामने)

1126 – विराट कोहली (36 सामने)

1112 – एमएस धोनी (72 सामने)

1013 – ओएन मॉर्गन (43 सामने)

1002 – विल्यम पॉर्टरफिल्ड (56 सामने)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---