---Advertisement---

चक्क एका गोलंदाजाने आणले दूसऱ्या गोलंदाजाच्या डोळ्यात पाणी, पहा नक्की काय झालं

On: मंगळवार, सप्टेंबर 22, 2020 11:15 PM
---Advertisement---

आज शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल २०२०चा चौथ्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या राजस्थान संघाने २० षटकात ७ विकेट्स गमावत २१६ धावांचा मोठा स्कोर उभा केला होता.

झाले असे की, सुरुवातीला राजस्थान संघाने युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथला फलंदाजीसाठी मैदानावर उतरवले. पण जयस्वाल ६ धावा करत ३.३ षटकातच पव्हेलियनला परतला. पुढे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (७४ धावा) आणि स्मिथने (५२ धावा) वादळी खेळी करत १२व्या षटकापर्यंत संघाचा डाव १३२ धावांवर नेला.

तर दूसऱ्या बाजूला जस जसा डाव पुढे जात होता, तस तशी चेन्नई संघाची गोलंदाजी बिघडत होती. डावातील शेवटच्या म्हणजे २०व्या षटकात तर अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. चेन्नईचा कर्णधार धोनीने ‘डेथ ओव्हर स्पेशलिस्ट’ लुंगी एन्गिडीला शेवटचे षटक टाकण्यास दिले. अशात या गोलंदाजाने राजस्थानचा गोलंदाज जोफ्रा आर्चरला तब्बल ४ षटकार देत ३० धावा दिल्या. यात त्याने टाकलेल्या २ नो बॉल आणि एका वाइड बॉलचाही समावेश होता.

या अतिशय खराब गोलंदाजी प्रदर्शनामुळे एन्गिडीने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो आयपीएलमध्ये २०व्या षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्याच्यासोबत (२०२०मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध) किंग्स इलेव्हन पंजाबचा ख्रिस जॉर्डन आणि (२०१७मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध) राइझिंग पुणे सुपरजायंट्सचा अशोक दिंडा संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत.

तर ड्वेन ब्रावोने हा नकोसा विक्रम गतवर्षी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना केला होता. त्यावेळी त्याने २०व्या षटकात २९ धावा दिल्या होत्या. तर शिवम मावीने २०१८ साली दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २९ धावा देत हा नकोसा विक्रम नावावर केला होता.

आयपीएलमध्ये २०व्या षटकात सर्वात खराब गोलंदाजी करणारे ५ गोलंदाज

लुंगी एन्गिडी – ३० धावा, विरुद्ध राजस्थान रॉयल्स (आज)

अशोक दिंडा – ३० धावा, विरुद्ध मुंबई इंडियन्स (२०१७)

ख्रिस जॉर्डन – ३० धावा, विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (२०२०)

ड्वेन ब्रावो – २९ धावा, विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (२०१९)

शिवम मावी – २९ धावा, विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स (२०१८)

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वास बसणार नाही पण हे खरंय! फलंदाजाने २ चेंडूत केल्या तब्बल २७ धावा

चेन्नईच्या स्टार गोलंदाजाने ५ वर्षांपुर्वी स्वत:बद्दलच केलेली भविष्यवाणी आज ठरलीये खरी

एकेवेळी पाणीपुरी विकणारा क्रिकेटर झाला आयपीएलमध्ये राजस्थानचा सलामीवीर

ट्रेंडिंग लेख –

पंचांच्या चुकीमुळे इतिहासात दुसऱ्यांदा कसोटी टाय झाली

१९९२ क्रिकेट विश्वचषकाची दुसरी ओळख म्हणजे मार्टिन क्रो

सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या पराभवाची ‘ही’ आहेत ५ कारणे, घ्या जाणून…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---