fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वास बसणार नाही पण हे खरंय! फलंदाजाने २ चेंडूत केल्या तब्बल २७ धावा

September 22, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील चौथा सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकत एमएस धोनीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतू राजस्थानच्या संजू सॅमसन, स्टिवन स्मिथ व जोफ्रा आर्चरने हा निर्णय अयोग्य ठरवत चेन्नईची चांगलीच धुलाई केली.

राजस्थानने निर्धारित २० षटकांत ७ बाद २१६ धावा करताना चेन्नईच्या जवळपास सर्वच फलंदाजांची चांगलीच धुलाई केली. संजू सॅमसनने ३२ चेंडूत ७४, स्टिवन स्मिथने ४७ चेंडूत ६९ तर जोफ्रा आर्चरने ८ चेंडूत २७ धावा केल्या. या सामन्यात राजस्थानकडून १७ षटकारांची बरसात पहायला मिळाली. विशेष म्हणजे या तीन खेळाडूंनी मिळूनच हे १७ षटकार मारले.

जोफ्रा आर्चरने केल्या २ चेंडूत २७ धावा

या सामन्यात १९ षटकांनंतर राजस्थानची ७ बाद १८६ अशी स्थिती होती. खेळपट्टीवर टॉम करन ९ तर जोफ्रा आर्चर १ धावेवर खेळत होते. त्यानंतर शेवटचे षटक घेऊन चेन्नईकडून लुंगी न्गिडी हा गोलंदाज आला. त्याच्या पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरने लॉंग ऑफला षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर जोफ्राने पुन्हा स्केअर लेगवरुन षटकार मारला. त्यानंतर न्गिडीने तिसरा चेंडू नो बॉल टाकला. या चेंडूवर जोफ्राने लॉंग ऑनला षटकार मारला. त्यानंतर पुढचा चेंडूही नो बॉल होता व त्यावरी जोफ्राने लॉंग ऑफला चौथा षटकार मारला. त्यानंतर न्गिडीने एक वाईड चेंडू टाकला. यामुळे ४ षटकारांच्या एकूण २४ धावा, नो बॉलच्या २ धावा व वाईड चेंडूची १ अशा केवळ २ चेंडूंवर तब्बल २७ धावा झाल्या.

ठरले आयपीएलमधील सर्वात महागडे २०वे षटक

आयपीएलमध्ये यापुर्वी अशोक दिंडाने २०१७मध्ये पुण्याकडून खेळताना मुंबईविरुद्ध विसाव्या षटकात ३० धावा दिल्या होत्या. त्यानंतर जॉर्डनने पंजाबकडून खेळताना दिल्लीविरुद्ध विसाव्या षटकात २०२०मध्येच ३० धावा दिल्या. तर आजच्या सामन्यात लुंगी न्गिडीने विसाव्या षटकात ३० धावा दिल्या.


Previous Post

राजस्थानच्या स्टार गोलंदाजाने ५ वर्षांपुर्वी स्वत:बद्दलच केलेली भविष्यवाणी आज ठरलीये खरी

Next Post

धोनी, रोहित, विराट सारख्या दिग्गजांनाही न जमलेला विक्रम ‘या’ पठ्ठ्याने केलाय नावावर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@DelhiCapitals
IPL

फॅन मुमेंट! तगड्या लढतीनंतर आवेश खानमधील रोहित शर्माचा चाहता झाला जागा, केली ‘ही’ खास गोष्ट

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘चेन्नईकडून खेळताना कधी पाहू शकतो?’ चाहत्याच्या प्रश्नाला ताहिरने मन जिंकणारे उत्तर

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…”

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून दक्षिण आफ्रिका संघ होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण

April 22, 2021
Next Post

धोनी, रोहित, विराट सारख्या दिग्गजांनाही न जमलेला विक्रम 'या' पठ्ठ्याने केलाय नावावर

चक्क एका गोलंदाजाने आणले दूसऱ्या गोलंदाजाच्या डोळ्यात पाणी, पहा नक्की काय झालं

अबब! चेन्नईविरुद्ध राजस्थानने केला खतरनाक विक्रम, ठरला केवळ दुसरा संघ

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.