---Advertisement---

धोनी, रोहित, विराट सारख्या दिग्गजांनाही न जमलेला विक्रम ‘या’ पठ्ठ्याने केलाय नावावर

On: मंगळवार, सप्टेंबर 22, 2020 10:56 PM
---Advertisement---

१९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाची सुरुवात झाली आहे. या हंगामातील चौथा सामना आज शारजाह क्रिकेट स्टेडिअम, शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघात खेळला जात आहे. चेन्नईचा या स्पर्धेतील हा दुसरा सामना आहे, तर राजस्थान या स्पर्धेतील आपला पहिलाच सामना खेळत आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फंलदाजीसाठी मैदानावर आलेल्या राजस्थान संघाने दमदार खेळत २० षटकात ७ विकेट्स गमावत २१६ धावा केल्या.

यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा मोलाचा वाटा राहिला. त्याने आल्यानंतर चौफेर फटकेबाजी करत केवळ १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यात त्याच्या ६ षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. यासह सॅमसन हा राजस्थान संघाकडून सर्वात जलद अर्धशतक करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

एवढ्यावरच तो थांबला नाही तर, पुढेही त्याने चौकार-षटकारांचा वर्षाव चालू ठेवला. अखेर १२व्या षटकातील चौथ्या चेंडूवर लुंगी एन्डिगीने ऋतुराज गायकवाडच्या हातून त्याला झेलबाद केले. त्यामुळे सॅमसन ३२ चेंडूत ७४ धावा करत पव्हेलियनला परतला. यात त्याच्या एकूण ९ षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. यासह सॅमसनने एका शानदार विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.

सॅमसन हा आयपीएलच्या इतिहासात एका डावात तब्बल २ वेळा ९ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापुर्वी त्याने २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात एका डावात १० षटकार मारले होते. Sanju Samson is the only Indian player to hit 9+ Sixes twice in an IPL innings

याबरोबरच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा एका डावात ९ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याच्या नावाचा समावेश झाला आहे. त्याच्याव्यतिरिक्त एबी डिविलियर्स, आंद्रे रसल, ऍडम गिलख्रिस्ट आणि ब्रेंडन मॅक्यूलम यांनी प्रत्येकी २ वेळा एका डावात ९ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. तर ‘सिक्सर किंग’ ख्रिस गेल हा यादीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याने तब्बल ६वेळा हा पराक्रम केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

ज्या धोनीला आदर्श मानतो त्याच्याच संघाविरुद्ध संजू सॅमसनचे दोन मोठे विक्रम

पुणेकर ऋतुराज गायकवाडसाठी धोनीने ‘या’ खेळाडूला दाखवला संघाबाहेरचा रस्ता

आयपीएल आणि प्रेक्षकांमधील नात आहेच खास, मुंबई- चेन्नई सामन्याने केले अधोरेखित

ट्रेंडिंग लेख –

पंचांच्या चुकीमुळे इतिहासात दुसऱ्यांदा कसोटी टाय झाली

आजच्या सामन्यात ‘हे’ ५ खेळाडू गाजवणार मैदान, ठरू शकतात गेम चेंजर

पंचांच्या चुकीमुळे इतिहासात दुसऱ्यांदा कसोटी टाय झाली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---