fbpx
Friday, January 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजच्या सामन्यात ‘हे’ ५ खेळाडू गाजवणार मैदान, ठरू शकतात गेम चेंजर

Rajasthan Royals And Chennai Super Kings 5 Key Players Who Can Change The Game

September 22, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL & RajasthanRoyals

Photo Courtesy: Twitter/IPL & RajasthanRoyals


इंडियन प्रीमियर लीग २०२०च्या पहिल्याच सामन्यात विजेता ठरलेला चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघात आज आयपीएलचा चौथा सामना खेळला जाणार आहे. एमएस धोनी चेन्नई तर स्टिव्ह स्मिथ राजस्थानचे नेतृत्त्व करणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता शारजाह येथे हा सामना खेळला जाणार आहे.

धोनी आणि स्मिथने रायजिंग पुणे सुरजायंट्स संघाकडून एकत्र क्रिकेट खेळले आहे. आता हेच दोन खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. चेन्नई आजवर ३ वेळा आयपीएल विजेता ठरला आहे, तर राजस्थानने पहिल्याच हंगामात आयपीएल ट्रॉफी पटकावली होती.

जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांच्या अनुपस्थितीत राजस्थान संघ आजच्या सामन्यात संघर्ष करताना दिसू शकतो. तरीही संघात असे काही खेळाडू आहेत, जे गेमचेंजर ठरु शकतात. तर चेन्नईच्या काही धुरंदर खेळाडूंमध्येही सामन्याचा कायापालट करण्याची क्षमता आहे. Rajasthan Royals And Chennai Super Kings 5 Key Players Who Can Change The Game

तर बघूयात, कोण असू शकतात ते खेळाडू…

१. रॉबिन उथप्पा- राजस्थान रॉयल्स 

गतवर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सदस्य असलेला हा खेळाडू यावर्षी राजस्थानच्या ताफ्यात दाखल झाला आहे. हा ३४ वर्षीय अनुभवी खेळाडू राजस्थानकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरु शकतो आणि जास्तीत जास्त धावा संघाच्या खात्यात जोडू शकतो. उथप्पामध्ये मोठ-मोठे शॉट्स मारण्याची क्षमता आहे. त्याने गतवर्षी पूर्ण हंगामात १२ सामने खेळले होते. त्यातील ११ डावात फलंदाजी करताना त्याने २८२ धावा कुटल्या होत्या. यात त्याच्या नाबाद ६७ धावांचा समावेश होता. हा धुरंदर फलंदाज यावर्षी त्याच्या फॉर्ममध्ये अजून सुधार करत दमदार प्रदर्शन करु शकतो. त्यामुळे तो राजस्थानचा गेमचेंजर खेळाडू ठरु शकतो.

२. यशस्वी जयस्वाल- राजस्थान रॉयल्स 

१९ वर्षांखालील विश्वचषकात दमदार प्रदर्शन करत स्टार ठरलेला खेळाडू यशस्वी जयस्वाल हा आयपीएलच्या सर्वात युवा खेळाडूंपैकी एक आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत दमदार प्रदर्शन केले आहे. यशस्वीने २०१९ मध्ये एकमेव प्रथम श्रेणी सामना खेळला होता, त्यात त्याने एकूण २० धावा केल्या. त्याचबरोबर त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १३ सामन्यात ७७९ धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा सर्वोत्तम डाव २०३ धावांचा होता.

यशस्वी जोस बटलरच्या अनुपस्थितीत राजस्थान संघासाठी पावरप्लेमध्ये धावा जमा करण्यात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. याबरोबरच तो फिरकी गोलंदाजीही करु शकतो.

३. जोफ्रा आर्चर- राजस्थान रॉयल्स 

गेल्या २ वर्षांपासून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल्ससाठी मोलाचे योगदान देत आहे. पावरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये तो दमदार गोलंदाजी करण्याची क्षमता राखतो. त्यामुळे तो चेन्नईविरुद्धच्या सामन्यात अटीतटीच्या परिस्थितीत सामन्याचा कायापालट करु शकतो. आजवर या गोलंदाजाने २१ सामने खेळले आहेत, यात त्याने २६ विकेट्सची कामगिरी केली आहे.

४. अंबाती रायडू- चेन्नई सुपर किंग्स 

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्याच आयपीएल सामन्यात सामनावीर ठरलेला अंबाती रायडू आजच्या सामन्यातही दमदार खेळी करु शकतो. त्याने पहिल्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ४८ चेंडूत ७१ धावांची तूफानी खेळी केली होती. यात त्याच्या ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू आजच्या सामन्यातही अफलातून प्रदर्शन करु शकतो.

५. पियूष चावला- चेन्नई सुपर किंग्स 

युएईतील मैदाने फिरकीपटूंसाठी सोईस्कर आहेत. त्यामुळे यावर्षी आयपीएलमध्ये फिरकीपटूंचा जलवा पाहायला मिळू शकतो. अशात चेन्नईच्या ३१ वर्षीय फिरकीपटू पियूष चावलाने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अतिशय महत्त्वपूर्ण गोलंदाजी केली होती. त्याने ४ षटके टाकत फक्त २१ धावा दिल्या होत्या. दरम्यान त्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची विकेट चटकावली होती. त्यामुळे या खेळाडूला आजच्या सामन्यातील गेमचेंजर म्हणणे वावगे ठरणार नाही.

ट्रेंडिंग लेख-

-१९९२ क्रिकेट विश्वचषकाची दुसरी ओळख म्हणजे मार्टिन क्रो

-सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या पराभवाची ही आहेत ५ कारणे; घ्या जाणून…

-५ असे खेळाडू, जे आयपीएलमध्ये झालेत सर्वाधिक वेळा रनआऊट

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएल जिंकण्याच्या केकेआरच्या शक्यता वाढल्या, कारणही आहे तसंच खास

-कोहलीला बाद करणे क्रिकेटरला पडले पथ्यावर, दिग्गजांच्या यादीत झाला समावेश

-असा फॅन कधी पाहिलाही नसेल! टीव्हीसमोरच ‘या’ खेळाडूची केली आरती


Previous Post

हैद्राबाद संघावर आली डोकं धरायची वेळ, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू पडू शकतो पूर्ण हंगामातून बाहेर

Next Post

आयपीएल आणि प्रेक्षकांमधील नात आहेच खास, मुंबई- चेन्नई सामन्याने केले अधोरेखित

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

“पंचांनी आम्हाला मैदान सोडण्याचाही पर्याय दिला होता, पण…”, मोहम्मद सिराजने उलगडला सिडनीतील वर्णद्वेषी शेरेबाजी प्रकरणाचा घटनाक्रम

January 21, 2021
Photo Courtesy: Instagram
क्रिकेट

मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले विराट आणि अनुष्का; पाहा व्हिडिओ

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
क्रिकेट

“बीसीसीआयने विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करण्याचा विचार करावा”, इंग्लंडच्या माजी खेळाडूचे मत 

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@atkmohunbaganfc
टॉप बातम्या

आयएसएल २०२१ : सुपर सब विल्यम्सच्या गोलमुळे एटीके मोहन बागान विजयी

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

ब्रेकिंग! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, ‘या’ घातक खेळाडूंचे पुनरागमन

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

…म्हणून रिषभ पंतचे वडील आपल्या मुलाच्या छातीवर बांधायचे उशी

January 21, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएल आणि प्रेक्षकांमधील नात आहेच खास, मुंबई- चेन्नई सामन्याने केले अधोरेखित

Photo Courtesy: Twitter/ IPL

पुणेकर ऋतुराज गायकवाडसाठी धोनीने 'या' खेळाडूला दाखवला संघाबाहेरचा रस्ता

Photo Courtesy: www.iplt20.com

ज्या धोनीला आदर्श मानतो त्याच्याच संघाविरुद्ध संजू सॅमसनचे दोन मोठे विक्रम

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.