आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. कोरोना विषाणूमुळे बहुतेक खेळाडू बरेच दिवस मैदानापासून दूर होते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही मुंबईत त्याच्या घरी होता आणि तोही बऱ्याच महिन्यांनतर मैदानावर खेळण्यासाठी उतरला होता. त्याचे चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते आणि चाहत्यांची ही प्रतीक्षा सोमवारी संपली.
टॉस दरम्यान सोशल मिडियावर याची बरीच उदाहरणे पाहायला मिळाली. कोहलीच्या चाहत्यांचं त्याच्याबद्दलच प्रेम पाहायला मिळालं. बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
एका व्हिडिओमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार कोहली जेव्हा संघाच्या रणनीतीबद्दल बोलत होता तेव्हा टीव्ही स्क्रीनला त्याचा चाहता हातात दिवा ठेवून चक्क ओवाळतांना दिसला. यापुर्वी धोनी रोहितचे फॅन त्यांच्यासाठी असे काही करताना दिसले. परंतू आता विराटचे चाहतेही विराटसाठी अशा नवनविन गोष्टी करु लागले आहेत.
#Dream11IPL @RCBTweets @imVkohli @rcbfanarmy @TrendRCB @ViratiansTamil @TNVIRATArmy #ViratKohli #PlayBold My Friend @imVkohli Fan #SRHvRCB #Dream11IPL #IPL2020 Maximum Crazy Level 🔥 & He Is #ThalaAjith Fan All So #Valimai #Ajithkumar pic.twitter.com/bWaFnpLQi7
— Thala Bakthan _!ᵛᵃˡᶤᵐᵃᶤ!_ (@imThalaBakthan) September 21, 2020
नाणेफेक गमावल्यानंतर बंगलोरने चांगली सुरुवात केली आणि अतिशय चांगली फलंदाजी केली. युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल आणि ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर एरॉन फिंचने डावाची सुरुवात केली. पडिक्कलने क्रीजवर येताच चांगली फटकेबाजी केली. मात्र, पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर हैदराबादचा फलंदाज मिशेल मार्श जखमी झाला आणि अष्टपैलू विजय शंकरने उर्वरित दोन चेंडू फेकून हे षटक पूर्ण केले.