१९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाची सुरुवात झाली आहे. या हंगामातील चौथा सामना आज शारजाह क्रिकेट स्टेडिअम, शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघात खेळला जात आहे. चेन्नईचा या स्पर्धेतील हा दुसरा सामना आहे, तर राजस्थान या स्पर्धेतील आपला पहिलाच सामना खेळत आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजस्थान संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. राजस्थानने सलामीला युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथला पाठवले आहे. दरम्यान जयस्वालने एक चौकार मारत केवळ ६ धावा केल्या आणि दीपक चाहरच्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला.
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरला यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन. त्याने आल्यानंतर दमदार फटकेबाजी करत केवळ १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यात त्याच्या ६ षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. यासह सॅमसन हा राजस्थान संघाकडून सर्वात जलद अर्धशतक करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. तसेच या सामन्यात तो ३२ चेंडूत ७४ धावा काढून बाद झाला.
त्याव्यतिरिक्त ओविस शहा आणि जोस बटलर यांनी हा विक्रम केला आहे. ओविसने २०१२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना केवळ १९ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तर बटलरने २०१९मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना केवळ १८ चेंडूत हा पराक्रम केला होता.
याबरोबरच चेन्नई संघाविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सॅमसन दूसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल हा या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने २०१९मध्ये चेन्नईविरुद्धच्या सामन्यात केवळ १९ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. तर २०१५ साली सनराइजर्स हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने २० चेंडूत हा विक्रम केला होता.
राजस्थान रॉयल्सकडून सर्वात जलद अर्धशतक करणारे फलंदाज
जोस बटलर – १८ चेंडूत (दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, २०१९)
ओविस शहा – १९ चेंडूत (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०१२)
संजू सॅमसन – १९ सप्टेंबर (चेन्नई सुपर किंग्स, २०२०)
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक करणारे फलंदाज
केएल राहुल – १९ चेंडू (२०१९)
संजू सॅमसन – १९ चेंडू (२०२०)
डेव्हिड वॉर्नर – २० चेंडू (२०१५)
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल आणि प्रेक्षकांमधील नात आहेच खास, मुंबई- चेन्नई सामन्याने केले अधोरेखित
हैद्राबाद संघावर आली डोकं धरायची वेळ, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू पडू शकतो पूर्ण हंगामातून बाहेर
शून्यावर बाद होऊनही आयपीएलमध्ये फलंदाजाचे पहिल्यांदाच होतेय जोरदार कौतूक
ट्रेंडिंग लेख –
आजच्या सामन्यात ‘हे’ ५ खेळाडू गाजवणार मैदान, ठरू शकतात गेम चेंजर