यंदाच्या आयपीएलच्या १५व्या हंगामात गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यात १ पराभव सोडला, तर बाकीच्या ५ सामन्यात विजयच मिळवला आहे. त्यातील पाचवा विजय हा रविवारी (दि. १७ एप्रिल) झालेल्या आयपीएलच्या २९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मिळवला. गुजरातने हा सामना ३ विकेट्सने खिशात घातला. मात्र, असे असले, तरीही चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने एक खास कारनामा केला.
या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा प्रभारी कर्णधार राशिद खानने (Rashid Khan) नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आला होता. यावेळी जडेजाने शेवटच्या षटकात २ षटकार मारले. यावेळी तो नाबाद राहिला. त्याने १२ चेंडूत २२ धावा केल्या होत्या.
यासह तो आयपीएलमध्ये अखेरच्या षटकात सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. त्याने शेवटच्या षटकात फलंदाजी करताना ३०० धावा केल्या आहेत. या यादीत अव्वलस्थानी एमएस धोनी आहे. त्याने शेवटच्या षटकात फलंदाजी करताना आतापर्यंत ६२७ धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कायरन पोलार्ड असून त्याने ४०५ धावा केल्या आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे, त्याने २४८ धावा केल्या आहेत, तर पाचव्या स्थानी हार्दिक पंड्या आहे. त्याने २०६ धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये २०व्या षटकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
६२७ धावा- एमएस धोनी
४०५ धावा- कायरन पोलार्ड
३०० धावा- रवींद्र जडेजा*
२४८ धावा- रोहित शर्मा
२०६ धावा- हार्दिक पंड्या
याव्यतिरिक्त जडेजाने या सामन्याच्या शेवटच्या षटकात मारलेले २ षटकारांमुळे तो आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत २५ षटकार मारले आहेत. या यादीत पहिल्या स्थानी धोनी आहे. त्याने ५० षटकार मारले आहेत. दुसऱ्या स्थानी पोलार्ड आहे. पोलार्डने ३३ षटकार मारले आहेत. तसेच, चौथ्या स्थानी हार्दिक पंड्या आहे, त्याने २४ षटकार, तर रोहित शर्मा पाचव्या स्थानी असून त्याने २३ षटकार मारले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आयपीएलमध्ये २०व्या षटकात सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू
५० षटकार- एमएस धोनी
३३ षटकार- कायरन पोलार्ड
२५ षटकार- रवींद्र जडेजा*
२४ षटकार- हार्दिक पंड्या
२३ षटकार- रोहित शर्मा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिन तेंडूलकरनंतर आयपीएलमधील ‘या’ भारी विक्रमावर फक्त ऋतुचा ‘राज’, ठरला दुसराच भारतीय
लईच अवघड झालं! धवनच्या प्रायव्हेट पार्टला जोराने लागला चेंडू, काही मिनिटे मैदानावरच लागला लोळू
‘अरे कमीत कमी आयपीएल कर्णधारपदाचा तरी राजीनामा दे’, मुंबईच्या सलग ६ पराभवानंतर रोहितवर भडकले चाहते