भारतीय क्रिकेटमध्ये यंदाचा 2024 वर्ष कोणी गाजवला असेल, तो यशस्वी जयस्वाल आहे. आश्चर्यकारक म्हणजे यामध्ये विराट कोहली रोहित शर्माचा लांब पर्यंत संबंध नाही. बॉर्डर-गावस्कर मालिकेबद्दल (BGT 2024-25) बोलायचे तर, विराट किंवा गिल किंवा रोहित नाही तर जयस्वालने यामध्ये वर्चस्व गाजवले आहे. ज्यात धावा असो, शतक असो किंवा सरासरी असो, जयस्वाल हा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वात विश्वासार्ह फलंदाज ठरला आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा – यंदाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतासाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा यशस्वी जयस्वाल हा पहिला खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 8 डावात 359 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसरे भारतीय नाव नितीश रेड्डीचे आहे. ज्याने आतापर्यंत 294 धावा केल्या आहेत.
सर्वोत्तम सरासरी – बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये यशस्वी जयस्वाल हा दोन खेळाडूंपैकी एक आहे. ज्यांने आतापर्यंत 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने 51.29 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या मालिकेत आतापर्यंतची सर्वोत्तम सरासरी ट्रॅव्हिस हेडची आहे. ज्याने 58.57 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
सर्वाधिक शतके – स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी आतापर्यंत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये प्रत्येकी 2 शतके झळकावली आहेत आणि आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला दोन शतके झळकावता आलेली नाहीत. पण यशस्वी जयस्वाल, नितीश रेड्डी आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले आहे. जयस्वाल आणि केएल राहुल यांनी या मालिकेत टीम इंडियासाठी आतापर्यंत प्रत्येकी दोन अर्धशतके झळकावली आहेत.
सर्वाधिक चौकार – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताकडून सर्वाधिक चौकार मारणारा खेळाडूही जयस्वाल आहे. त्याने या मालिकेत आतापर्यंत 39 चौकार मारले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नितीश रेड्डी आहे, ज्यांने आतापर्यंत 30 चौकार मारले आहेत.
हेही वाचा-
भारत-ऑस्ट्रेलिया सोडा, हा संघही WTC फायनलमध्ये प्रवेश करू शकतो, जाणून घ्या समीकरण
…या कारणामुळे रोहित शर्मा प्लेइंग-11 मध्ये, इरफान पठाणचे मोठे वक्तव्य!
IND vs AUS; यशस्वी जयस्वाल नाबाद होता! बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला उघड पाठिंबा