---Advertisement---

दोन दिवसांपूर्वीच बेअरस्टोने केलेला विश्वविक्रम आता झाला बाबर आझमच्या नावावर

On: शुक्रवार, जुलै 5, 2019 8:00 PM
---Advertisement---

लंडन। आज(5 जूलै) 2019 विश्वचषकात लॉर्ड्सवर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 315 धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून इमाम उल हकने 100 धावांची शतकी खेळी केली. तसेच बाबर आझमने 96 धावांची खेळी केली.

आझमचे शतक केवळ 4 धावांनी हुकले. परंतू त्याने खास विश्वविक्रम रचला आहे. आझमचा हा पहिलाच विश्वचषक आहे. त्याने या विश्वचषकात 8 सामन्यात 474 धावा केल्या आहेत. त्यामुळे पदार्पणाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर झाला आहे.

त्याने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला मागे टाकले आहे. बेअरस्टोने दोन दिवसांपूर्वीच 3 जूलैला न्यूझीलंड विरुद्ध खेळताना हा विश्वविक्रम आपल्या नावे केला होता. बेअरस्टोचे सध्या 9 सामन्यात 462 धावा आहेत. बेअरस्टोचा हा विक्रम मोडला गेला असला तरी इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला असल्याने त्याला पुन्हा हा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.

आजच्या सामन्यात पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी बांगलादेशला 7 धावांवर सर्वबाद करणे आवश्यक होते. परंतू बांगलादेशने या सामन्यात दुसऱ्या षटकात एकही विकेट न गमावता 8 धावा करताच पाकिस्तानचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले.

त्यामुळे न्यूझीलंडने गुणतालिकेत चौथे स्थान पक्के केले असून उपांत्य फेरीतही प्रवेश केला आहे. आता विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ खेळतील.

पदार्पणाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

474 – बाबर आझम – 2019

462 – जाॅनी बेअरस्ट्रो – 2019

461 – राहुल द्रविड – 1999

447 – डेव्हिड बून – 1987

444 – केव्हिन पीटरसन – 2007

436 – मायकेल क्लार्क – 2007

428 – जेफ माॅर्श -1987

422 – जोनाथन ट्राॅट – 2011

412 – शिखर धवन, 2015

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

चौथ्या क्रमांकवर भारताने या खेळाडूला खेळवावे, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे मत

धोनीच्या टीकाकारांना दिग्गज भारतीय फुटबॉलपटू बायचूंग भुतियाने दिले सडेतोड उत्तर

फॅबिएन ऍलेनने एक हाती जबरदस्त झेल घेत सर्वांनाच केले थक्क, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment