नॉटींगघम। भारताने बुधवारी (22 आॅगस्ट) इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात ट्रेंटब्रिज मैदानावर 203 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-2 असे पुनरागमन केले आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात 97 आणि दुसऱ्या डावात 103 धावा करत दोन्ही डावात मिळून 200 धावा केल्या आहेत.
याबरोबरच त्याने नेतृत्व करताना जिंकलेल्या कसोटी सामन्यात 14 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराटने 38 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करताना 22 विजय मिळवले आहेत.
या 22 कसोटी विजयांमध्ये त्याने 8 शतके आणि 6 अर्धशतकांसह 14 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
यामुळे विराटने भारतीय कर्णधार म्हणून विजय मिळवलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचाही विक्रम केला आहे. हा विक्रम करताना त्याने एमएस धोनीला मागे टाकले आहे.
धोनीने कर्णधार म्हणून विजय मिळवलेल्या 27 कसोटी विजयांमध्ये 13 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यात त्याचे 4 शतके आणि 9 अर्धशतके आहेत.
या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली आहे. गांगुलीने नेतृत्व करताना 21 कसोटी विजयांमध्ये 10 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. गांगुलीने यात 3 शतके आणि 7 अर्धशतके केली आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीतील ५ खास विक्रम
–विराट कोहलीने संघाचा विजय समर्पित केला केरळमधील महापूरग्रस्तांना
–कोहलीच्या ‘विराट’ कामगिरीमुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा विक्रम धोक्यात