---Advertisement---

कर्णधार रोहित शर्मा बनला ‘सिक्सर किंग’, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणालाही मोडता येणार नाही हा विक्रम!

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2024 8:52 PM
rohit sharma
---Advertisement---

Rohit Sharma Record :- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हिटमॅन रोहित शर्मा याने शुक्रवारी (02 ऑगस्ट) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. 29 जूनला भारतीय संघाला टी20 विश्वचषक जिंकून दिल्यानंतर कर्णधार रोहित मोठ्या सुट्टीवर गेला होता. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी रोहित सुट्टी संपवून भारतीय संघात परतला. यावेळी महिनाभरानंतर मैदानावर पुनरागमन करताना रोहितचे रौद्र रूप पाहायला मिळाले.

श्रीलंकेविरुद्ध खेळताना रोहितने असा विक्रम रचला आहे, ज्याचा पाठलाग करणे आता इतर क्रिकेटपटूंना सोपे राहिलेले नाही. कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरला आहे.

रोहित शर्माने कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार ठोकले 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रोहित आता सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनचा विक्रम मोडीत काढला. शुक्रवारी (02 ऑगस्ट) कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रोहितने तिसरा षटकार ठोकत ही कामगिरी केली. रोहितने कर्णधार म्हणून आतापर्यंत एकूण 124 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये आता त्याच्या नावावर 234 षटकार आहेत. इयॉन मॉर्गनबद्दल बोलायचे झाले तर त्याने 198 सामन्यात इंग्लंडचे कर्णधारपद भूषवले आणि 233 षटकार मारले होते.

एमएस धोनी तिसऱ्या क्रमांकावर 
या यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचाही समावेश आहे. त्याने 332 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. या कालावधीत त्याच्या बॅटमधून 211 षटकार आले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगबद्दल बोलायचे झाले तर त्याने आपल्या कारकिर्दीत 324 सामन्यांमध्ये कर्णधार असताना 171 षटकार ठोकले आहेत. म्हणजेच या सर्व कर्णधारांबद्दल बोलायचे झाल्यास, रोहितने केवळ सर्वाधिक षटकारच मारले नाहीत तर त्या सर्वांपेक्षा कमी सामनेही खेळले आहेत. म्हणजेच रोहितसाठीही ही मोठी उपलब्धी आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून रोहितने किती षटकार मारलेत?
रोहितच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 59 सामने खेळताना आतापर्यंत एकूण 84 षटकार मारले आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने 262 सामने खेळले असून 323 षटकार मारले आहेत. टी20 बद्दल बोलायचे झाले तर हिटमॅनने 159 मॅचमध्ये 205 षटकार मारले आहेत. मात्र, कर्णधार म्हणून नव्हे तर खेळाडू म्हणून त्याने ही कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“अरे माझ्याकडे काय बघतोय?”, श्रीलंकन फलंदाजाच्या विकेटवरुन गोंधळलेल्या रोहितची मजेशीर प्रतिक्रिया

आयपीएलवाला रूल है क्या! भारतीय खेळाडूंचा मजेशीर संवाद स्टंप माईकमध्ये कैद, व्हिडिओ व्हायरल

चाहत्यांचा हार्टब्रेक! स्टार बॅडमिंटनपटूच्या हाती निराशा, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---