माऊंट मॉनगनुई| भारताचा न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनेड सामना बे ओव्हल मैदानावर पार पडला असून भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला आहे. तसेच 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने 77 चेंडूत 62 धावांची खेळी केली. यात त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचबरोबर त्याने एक खास विक्रम करत भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीची बरोबरी केली आहे.
रोहितचे भारताकडून खेळताना वनडेमध्ये 215 षटकार पूर्ण झाले आहेत. त्यामुळे तो भारताकडून वनडेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत धोनीसह अव्वल क्रमांकावर आला आहे. धोनीनेही भारताकडून वनडेत 215 षटकार मारले आहेत.
धोनीने भारताकडून 334 वनडे सामने खेळताना 215 षटकार मारले आहेत. तर रोहितने 199 सामन्यात 215 षटकार मारले आहेत.
त्याचबरोबर धोनीने कारकिर्दीत 3 वनडे सामने आशिया संघाकडून खेळले असल्याने त्याने या तीन सामन्यात 7 षटकार मारले आहेत. त्यामुळे त्याचे वनडेत एकूण षटकार 222 आहेत. पण भारताकडून त्याने 215 षटकार मारले आहेत.
भारताकडून वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
215 – रोहित शर्मा
215 – एमएस धोनी
195 – सचिन तेंडुलकर
189 – सौरव गांगुली
153 – युवराज सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
–रोहित-कोहलीची जोडी हिट, केला हा मोठा पराक्रम
–रोहित शर्मा झाला ‘दस हजारी मनसबदार’
–या कारणामुळे एमएस धोनीला बसावे लागले तिसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर