---Advertisement---

अबब! चेन्नईविरुद्ध राजस्थानने केला खतरनाक विक्रम, ठरला केवळ दुसरा संघ

On: मंगळवार, सप्टेंबर 22, 2020 11:45 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० मधील ४ था सामना शारजाह क्रिकेट स्टेडिअम, शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. धोनीचा हा निर्णय राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने चुकीचा ठरवला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचा पहिला विकेट हा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालच्या रूपात अवघ्या ११ धावांवर पडला. त्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी जी धुलाईला सुरुवात केली, ती उल्लेखनीय होती. कर्णधार स्मिथने नाबाद (६९ धावा, ४ चौकार आणि ४ षटकार) आणि धडाकेबाज फंलदाज संजू सॅमसनने (७४ धावा, १ चौकार आणि ७ षटकार) अर्धशतकी खेळी करत दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांपेक्षाही अधिक धावांची भागीदारी केली. त्यानंतर संघांचे झटपट विकेट्स पडत गेले. ७ वी विकेट पडल्यानंतर फलंदाजीला जोफ्रा आर्चर आला. आर्चरने केवळ ८ चेंडू खेळत २७ धावा केल्या. यामध्ये ४ षटकारांचा समावेश होता.

स्मिथ, सॅमसन आणि आर्चरच्या शानदार फटकेबाजीमुळे राजस्थानने चेन्नईविरुद्ध तब्बल १७ षटकार ठोकले. हे षटकार ठोकल्यामुळे राजस्थान संघाने आयपीएलमध्ये चेन्नई संघाविरुद्ध एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकत कोलकाता नाईट रायडर्स संघाची बरोबरी केली आहे.

यापूर्वी २०१८मध्ये केकेआर संघानेही चेन्नईविरुद्ध तब्बल १७ षटकार ठोकले होते. त्यादरम्यान दिनेश कार्तिक (१) सुनिल नरेन (२), रॉबिन उथप्पा (३) आणि आंद्रे रसेलने (११) षटकार ठोकले होते.

चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे संघ

१७ षटकार- कोलकाता नाईट रायडर्स (२०१८)

१७ षटकार- राजस्थान रॉयल्स (२०२०)*

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---