इंग्लंड क्रिकेट संघाने गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) ऍडलेड येथे झालेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात शानदार विजय मिळवला. इंग्लंडने भारतीय संघाला 10 विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. आता अंतिम सामन्यात इंग्लंडला पाकिस्तानचा सामना करायचा आहे. मात्र, त्यापूर्वी भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर तुफान गाजला. ऍलेक्स हेल्स याने या सामन्यात सर्वाधिक धावा चोपत खास विक्रमाची नोंद केली.
इंग्लंडने सहज गाठले भारताचे आव्हान
इंग्लंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 6 विकेट्स गमावत 168 धावा चोपल्या. हे आव्हान इंग्लंडने 16 षटकात त्यांच्या सलामीवीरांच्या जोरावर गाठले. इंग्लंडने एकही विकेट न गमावता 170 धावा चोपल्या आणि भारताचे आव्हान पार केले. तसेच, टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही प्रवेश केला.
There was a Hales-storm in Adelaide today! 💥
Relive the sensational knock ➡️ https://t.co/ZSVfowphEA#T20WorldCup | #INDvENG pic.twitter.com/1Oc0fhBlZe
— T20 World Cup (@T20WorldCup) November 10, 2022
इंग्लंडचे सलामीवीर कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि ऍलेक्स हेल्स (Alex Hales) यांनी कडवी झुंज देत भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. या दोघांनीही 170 धावांची आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी रचली. यामध्ये हेल्सच्या 86 (47 चेंडूत) आणि बटलरच्या 80 (49 चेंडूत) धावांचा समावेश होता. हेल्सने 86 धावा चोपताना चौकारांचा नाही, पण षटकारांचा चांगलाच पाऊस पाडला. त्याने या खेळीत तब्बल 7 षटकार भिरकावले. यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
Alex Hales put on a show in Adelaide 🎆
For his fiery 47-ball 86*, he is the @aramco POTM 🌟 pic.twitter.com/eWCpUVeRS8
— ICC (@ICC) November 10, 2022
ऍलेक्स हेल्स याने टी20 विश्वचषकाच्या बाद फेरीत सर्वाधिक षटकार (Most sixes in an innings in T20 World Cup knockouts ) मारण्याचा कारनामा केला. त्याने भारताविरुद्ध खेळताना मारलेले 7 षटकार हे आतापर्यंतचे बाद फेरी सामन्याच्या डावातील सर्वाधिक षटकार होते. त्यामुळे तो टी20 विश्वचषकाच्या बाद फेरीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 7 षटकारांसह अव्वलस्थानी विराजमान झाला.
या यादीत 6 षटकारांसह दुसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या तीन खेळाडू आहेत. यामध्ये माईक हसी, ख्रिस गेल आणि मार्लोन सॅम्युअल्स यांचा समावेश आहे. हसीने पाकिस्तानविरुद्ध 2010च्या बाद फेरीतील डावात सर्वाधिक 6 षटकार मारले होते. तसेच, गेलने 2012 टी20 विश्वचषकाच्या बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 षटकार भिरकावले होते. याच वर्षी वेस्ट इंडिजच्या सॅम्युअल्सने श्रीलंकेविरुद्ध 6 षटकार मारले होते. (Most sixes in an innings in T20 World Cup knockouts see list)
टी20 विश्वचषकाच्या बाद फेरीतील डावात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
7 षटकार- ऍलेक्स हेल्स (विरुद्ध- भारत, 2022)*
6 षटकार- माईक हसी (विरुद्ध- पाकिस्तान, 2010)
6 षटकार- ख्रिस गेल (विरुद्ध- ऑस्ट्रेलिया, 2012
6 षटकार- मार्लोन सॅम्युअल्स (विरुद्ध- श्रीलंका 2012)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जोडी जबरदस्त! टीम इंडियाला चोपत बटलर-हेल्सने वर्ल्ड रेकॉर्डही केलाय
गोलंदाजांमुळे भारत पराभूत झाला? वाचा पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला