क्रिकेटमध्ये प्रेक्षक सर्वाधिक कोणती गोष्ट पाहुन आनंदी होतं असतील तर ते अर्थातच षटकार. एकवेळी सामन्यात एखादे-दोन दिसणारे षटकार हे टी२०मध्ये अगदी ५-१०-१५ एकाच सामन्यात दिसु लागले. तरीही षटकारांचे महत्त्व कमी झाले नाही. कोण लांब षटकार मारतो, कुणी किती षटकार मारलेत याची कायमच चर्चा होतं आली आहे.
एकेकाळी गांगुलीच्या षटकारांची खूप चर्चा होतं असे. परंतु पुढे भारतीय संघात युवराज सिंग आला व गांगुलीच्या षटकारांची चर्चा थोडी मागे पडली. त्यानंतर आलेल्या धोनी व नंतर आलेल्या रोहितने तर ही चर्चा कायम आपल्याभोवतीच कशी राहिली याची तजवीज केली.
या लेखात आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, वनडे व आंतरराष्ट्रीय टी२० सामने) सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंची माहिती घेणार आहोत. most sixes in international cricket.
५. एमएस धोनी (३५९ षटकार)
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ५वा आहे. धोनीने ५३८ सामन्यातील ५२६ डावात फलंदाजी करताना ३५९ षटकार मारले आहेत. त्याने कसोटीत ७८, वनडेत२२९ व टी२०मध्ये ५२ षटकार मारले आहेत. कर्णधार असताना त्याने ३३२ सामन्यात ३३० वेळा फलंदाजी करताना २११ षटकार मारले आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम धोनीच्याच नावावर आहे.
४. ब्रेंडन मक्क्युलम (३९८ षटकार)
न्यूझीलंडचा माजी कर्णधार असलेल्या ब्रेंडन मॅक्क्युलमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४३२ सामन्यात ४७४ डावात ३९८ षटकार मारले आहे. त्याचा ४०० षटकारांचा विक्रम केवळ २ षटकारांनी हुकला. त्याने कसोटीत १०७, वनडेत २०० व टी२०मध्ये ९१ षटकार मारले आहेत. त्यानेही कर्णधार असताना १४० डावात १७० षटकार मारले आहेत. कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मॅक्क्युलमच्याच नावावर आहे.
३. रोहित शर्मा (४२३ षटकार)
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३६४ सामन्यातील ३७० डावात ४२३ षटकार मारले आहेत. कसोटी ५२, वनडे २४४ व टी२०त १२७ षटकार रोहितने मारले आहेत. रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडण्यासाठी सध्या १११ षटकरांची गरज आहे. रोहितचा षटकार मारण्याचा एकंदरीत सुर पाहता तो हा विक्रम नक्की आपल्या नावावर करेल. वनडेत एका डावात रोहितने १६ षटकारही मारले आहेत. वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदांच्या यादीत रोहित चौथा आहे. तर टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मात्र रोहितच्याच नावावर आहे.
२. शाहिद आफ्रिदी (४७६ षटकार)
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू कर्णधार शाहिद आफ्रिदीने ५२४ आंतरराष्ट्रीय सामन्यात ५०८ वेळा फलंदाजी करताना ४७६ षटकार मारले आहेत. यात त्याने वनडेत ३५१, कसोटीत ५२ व टी२०मध्ये ७३ षटकार मारले आहेत. ज्यावेळी स्फोटक फलंदाजी अन्य फलंदाज करत नव्हते त्या काळात आफ्रिदीने आपल्या षटकारांनी जगात एक वेगळीच ओळख निर्माण केली होती.
१. ख्रिस गेल (५३४ षटकार)
युनिवर्सल बाॅस ख्रिस गेलने ४६२ सामन्यात ५३० डावात खेळताना ५३४ षटकार मारले आहेत. क्रिकेटच्या तीनही प्रकारात १०० पेक्षा अधिक षटकार मारण्याची किमया मात्र गेलला साधता आली नाही. त्याने कसोटीत ९८, वनडेत ३३१ व टी२० क्रिकेटमध्ये १०५ षटकार मारले आहेत. परंतु हा विक्रम रोहित शर्माकडून मोडला जाऊ शकतो.
मनोरंजक लेख-
–बापरे! एमएस धोनीला कूल कॅप्टन्सीसाठी मिळाला होता सामनावीर पुरस्कार
–आणि फिल्डरला अद्भुत कामगिरीसाठी मिळाला होता मॅन ऑफ द मॅच
–एक नाही दोन नाही तर सगळ्या संघालाच जेव्हा दिली होती मॅन ऑफ द मॅच
–एकही विकेट, धाव किंवा झेल न घेणाऱ्या खेळाडूला जेव्हा मिळतो मॅन ऑफ द मॅच
–जेव्हा ग्राऊंड्समनला दिला होता मॅन ऑफ द मॅच पुरस्कार