वेलिंग्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील टी२० मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाच नेतृत्व प्रभारी कर्णधार रोहित शर्मा करणार आहे.
भारतीय संघाने वनडे मालिका कालच ४-१ अशी जिंकली आहे. त्यामुळे टी२० मालिकेतही संघाकडून अशीच अपेक्षा आहे.
तीन सामन्यांच्या या टी२० मालिकेत जर रोहितने दोन सामने जिंकले तर कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक टी२० सामने जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी येईल.
रोहितने १२ टी२० सामन्यात संघाचे नेतृत्व करताना तब्बल ११ सामने जिंकले आहेत.
भारताकडून सर्वाधिक टी२० सामने जिंकण्याचा विक्रम माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावावर आहे. धोनीने ७२ सामन्यात नेतृत्व करताना ४१ टी२० सामने जिंकले आहे.
तर या यादीत भारताकडून दुसऱ्या स्थानी असलेल्या विराटने २० टी२० सामन्यात संघाला १२ विजय मिळवून दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–२०१९च्या विश्वचषकात हा खेळाडू असणार रोहित-धवनला पर्याय
–१२०४ फलंदाजांनी ज्याचा विचारही केला नसेल तो विक्रम करण्यासाठी रोहित सज्ज
–टीम इंडिया विरुद्धच्या टी२० मालिकेला न्यूझीलंडचा हा स्पोटक खेळाडू मुकणार, जाणून घ्या कारण
–पुणेकर केदार जाधवसाठी एमएस धोनीचा मराठमोळा अंदाज, पहा व्हिडिओ
–मोहम्मद शमी अशी कामगिरी करणारा ठरला केवळ तिसराच वेगवान भारतीय गोलंदाज