हैद्राबाद। भारत विरुद्ध विंडिज संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी( 13 आॅक्टोबर) भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून एक खास विक्रम केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये विराट आशिया खंडातमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा कर्णधार ठरला आहे. त्याने हा विक्रम करताना पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बा उल हकला मागे टाकले आहे.
विराटने या सामन्यात 78 चेंडूत 5 चौकारांच्या सहाय्याने 45 धावांची खेळी केली आहे. मात्र त्याला विंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने पायचीत केले.
त्यामुळे विराटने आत्तापर्यंत कसोटी कर्णधार म्हणून 42 सामन्यात 65.12 च्या सरासरीने 4233 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 17 शतकांचा आणि 9 अर्धशतकांचाही समावेश आहे.
त्याचबरोबर विराट कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 4000 धावांचा टप्पा पार करणारा भारताचा पहिलाच क्रिकेटपटूही ठरला आहे.
या सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत पहिल्या डावात 4 बाद 173 धावा केल्या आहेत. भारताकडून या डावात सर्वाधिक धावा पृथ्वी शॉने केल्या आहेत. त्याने 70 धावांची अर्धशतकी खेळी केली.
आशिया खंडात कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार –
4233 धावा – विराट कोहली (42 सामने)
4215 धावा – मिस्बा उल हक (56 सामने)
3665 धावा – माहेला जयवर्धने (38 सामने)
3454 धावा – एमएस धोनी (60 सामने)
3449 धावा – सुनील गावस्कर (47 सामने)
महत्वाच्या बातम्या-
- विराटप्रमाणे जॉनी बेअरस्टोने केला यावर्षी हा मोठा पराक्रम
- शानदार अर्धशतक करणाऱ्या पृथ्वी शॉचे नाव झाले या दिग्गजांच्या यादीत सामील
- १६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आयर्लंडच्या या दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती