---Advertisement---

उपांत्य फेरीत प्रवेश करताच न्यूझीलंडने केली या विश्वविक्रमाची बरोबरी

On: शुक्रवार, जुलै 5, 2019 8:40 PM
---Advertisement---

लंडन। आज (5 जूलै) 2019 विश्वचषकात लॉर्ड्सवर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी बांगलादेशला 7 धावांवर सर्वबाद करणे आवश्यक होते. जेणेकरुन ते न्यूझीलंडच्या नेट रनरेटला मागे टाकू शकतील आणि उपांत्य फेरीतील स्थान पक्के करु शकतील.

परंतू पाकिस्तानने दिलेल्या 316 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकातच बांगलादेशने बिनबाद 8 धावा करताच न्यूझीलंडचे गुणतालिकेतील चौथे स्थान पक्के झाले आणि न्यूझीलंडचा उपांत्य फेरीतील प्रवेशही निश्चित झाला आहे. मात्र पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.

त्यामुळे आता 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ खेळतील.

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही न्यूझीलंडची 8 वी वेळ आहे. त्यामुळे विश्वचषकात सर्वाधिक वेळा उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या ऑस्ट्रेलिया विश्वविक्रमाशी न्यूझीलंडने बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियानेही विश्वचषकातील उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची यावर्षीची ही 8 वी वेळ आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या पाठोपाठ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारताने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही 7 वी वेळ आहे.

विश्वचषकात सर्वाधिक वेळा उपांत्य फेरीत प्रवेश करणारे संघ –

8 – ऑस्ट्रेलिया / न्यूझीलंड

7 – भारत

6 – पाकिस्तान /इंग्लंड

4 – वेस्ट इंडीज / श्रीलंका / दक्षिण आफ्रिका

1 – केनिया

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

दोन दिवसांपूर्वीच बेअरस्टोने केलेला विश्वविक्रम आता झाला बाबर आझमच्या नावावर

चौथ्या क्रमांकवर भारताने या खेळाडूला खेळवावे, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे मत

धोनीच्या टीकाकारांना दिग्गज भारतीय फुटबॉलपटू बायचूंग भुतियाने दिले सडेतोड उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment