गुरुवारी (दि. ०९ जून) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना पार पडला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर इशान किशन याने खास कारनामा केला. विशेष म्हणजे, त्याने या विक्रमात रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांचीही बरोबरी केली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय (India) संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २११ धावा चोपल्या. या धावा करताना भारताकडून फलंदाजीला आलेल्या सलामीवीर इशान किशन (Ishan KishanPhoto Courtesy: Twitter/BCCI) याने जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने यावेळी फलंदाजी करताना ४८ चेंडूत ७६ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि ११ चौकारांचीही बरसात केली. या धावा करताना त्याचा स्ट्राईक रेट हा तब्बल १५८. ३३ इतका होता. विशेष म्हणजे, या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा त्यानेच केल्या. इतक्या जबरदस्त स्ट्राईक रेटने धावा चोपल्यामुळे किशनच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
या फटकेबाजीमुळे किशन हा २४ वयापूर्वीच १५०हून अधिकच्या स्ट्राईक रेटने भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. त्याने ही कामगिरी २ वेळा केली आहे. त्याने ही कामगिरी करत रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांची बरोबरी केली. रोहित आणि रैनानेही भारताकडून खेळताना २४ वयापूर्वीच १५०हून अधिकच्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक धावा चोपल्या होत्या.
अवघ्या २४ वयापूर्वी भारतासाठी १५०हून अधिकच्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
२ वेळा- इशान किशन*
२ वेळा- रोहित शर्मा
२ वेळा- सुरेश रैना
भारतीय संघ करू शकतो विक्रम
भारतीय संघाला या सामन्यात एक विक्रम करण्याची संधी आहे. भारतीय संघाने खेळलेल्या मागील सलग १२ सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने जर हा सामना जिंकला, तर भारत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सलग १३ सामने जिंकणारा पहिला संघ बनेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दात तुटून रक्तबंबाळ झालेलं फलंदाजाचं तोंड, पाहा एँडरसनने फेकलेल्या घातक चेंडूचा व्हिडिओ
दीडशेहून अधिक वेगाने बॉलिंग करणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजावरील बॅन हटला, ‘या’ कारणामुळे आणली होती बंदी
‘मी ही जागा कुठेतरी पाहिलीये’, दिनेश कार्तिकच्या पुनरागमनावर माजी दिग्गजाची प्रतिक्रिया व्हायरल