नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर भारताने बुधवारी (२२ आॅगस्ट) इंग्लंडवर २०३ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या दिवशी अार अश्विनने जेम्स अॅंडरसनला बाद करत हा विजय मिळवला.
या सामन्यात इंग्लंड संघाच्या दोन डावात ज्या २० विकेट्स गेल्या, त्यातील १९ विकेट्स या चक्क वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. केवळ आज जेम्स अॅंडरसनची दुसऱ्या डावातील विकेट ही फिरकीपटू आर अश्विनला मिळाली.
यापुर्वी केवळ जानेवारी महिन्यात जोहान्सबर्ग कसोटीत भारतीय वेगवान गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या २० पैकी २० विकेट्स घेतल्या होत्या.
आजच्या सामन्यातील १९पैकी बुमराह ७, हार्दिक पंड्या ६, इशांत शर्मा ४ आणि मोहम्मद शमीने २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–बुमराह आणि नो बाॅल…टायटॅनिकपेक्षाही भारी लव्हस्टोरी….
–इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम
–केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी