---Advertisement---

आदिल रशीदचा नाद पराक्रम! बांगलादेशविरुद्ध 4 विकेट्स घेताच ब्रॉडच्या विक्रमही काढला मोडीत, रेकॉर्ड पाहाच

Adil-Rashid
---Advertisement---

इंग्लंड संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांची वनडे आणि टी20 मालिका खेळली जाणार आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 3 विकेट्सने जिंकला. त्यानंतर दुसरा वनडे सामना शुक्रवारी (दि. 3 मार्च) ढाका येथे खेळला गेला. या सामन्यातही इंग्लंडनेच वर्चस्व गाजवत 132 धावांनी विजय मिळवला. तसेच, मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. यादरम्यान इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद याने खास विक्रम नावावर केला. तो इंग्लंडकडून वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बनला.

झाले असे की, बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 326 धावा चोपल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेश संघाला 44.4 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 194 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना इंग्लंडने 132 धावांच्या मोठ्या फरकाने खिशात घातला. यादरम्यान इंग्लंडकडून गोलंदाजी करताना आदिल रशीद (Adil Rashid) याने बांगलादेशच्या 10 पैकी 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

आदिल रशीद याने 10 षटके गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने 45 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या. यामध्ये शाकिब अल हसन, महमदुल्लाह, अफिफ हुसेन आणि तस्कीन अहमद यांच्या विकेट्सचा समावेश होता. या 4 विकेट्स घेताच स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याला मागे टाकत रशीद इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बनला. त्याच्या नावावर 181 वनडे विकेट्सची नोंद झाली.

https://twitter.com/englandcricket/status/1631639115262205958

इंग्लंडसाठी वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारा अव्वल क्रमांकाचा गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) असून त्याने 269 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानी डॅरेन गफ असून त्यांनी 234 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, चौथ्या स्थानी स्टुअर्ट ब्रॉड असून त्याने 178 विकेट्स घेतल्या आहेत. यादीत शेवटच्या स्थानी अँड्र्यू फ्लिंटॉफ आहे. त्याने वनडेत 168 विकेट्स घेतल्या आहेत. (Most wickets for England in ODIs see list)

इंग्लंडसाठी वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
269 – जेम्स अँडरसन
234 – डॅरेन गफ
181 – आदिल रशीद*
178 – स्टुअर्ट ब्रॉड
168 – अँड्र्यू फ्लिंटॉफ

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ही भारतीय गोलंदाजांची मेहनत नाही, तर मजुरीये…’, रोहितच्या वक्तव्यावर दिग्गजाचा पलटवार
ब्रेकिंग! संघाला टी20 वर्ल्डकपमध्ये घेऊन जाणाऱ्या कर्णधाराची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---