आयपीएल २०२० मधील शेवटचा साखळी सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) शारजाह येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स झाला. या सामन्यात हैदराबादचा घातक गोलंदाज संदीप शर्माने एक खास कारनामा केला.
नाणेफेक जिंकून हैदराबादने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आणि मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकने डावाची सुरुवात केली. यादरम्यान हैदराबादकडून तिसरे षटक टाकण्यास संदीप शर्मा आला होता. त्याने रोहितला आपल्या षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर कर्णधार डेविड वॉर्नरकडून झेलबाद केले. त्यामुळे रोहितला ४ धावांवरच तंबूचा रस्ता धरावा लागला.
यानंतर क्विंटन डी कॉकने चांगली फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने डावातील पाचवे षटक टाकण्यास आलेल्या संदीप शर्माच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर चौकार आणि पुढील सलग दोन चेंडूवर षटकार ठोकले. यावेळी डी कॉक २५ धावांवर खेळत होता. परंतु याच षटकातील चौथ्या चेंडूवर संदीपने डी कॉकचा त्रिफळा उडवला. त्यामुळे मुंबईची धावसंख्या पहिल्या ५ षटकात २ विकेट्स गमावत ३९ इतकी झाली. यानंतर त्याने १७ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धडाकेबाज फलंदाजी करत असलेल्या इशान किशनलाही ३३ धावांवर पव्हेलियनमध्ये धाडलं.
संदीपने रोहित, डी कॉकची आणि इशानची महत्त्वपूर्ण विकेट घेत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. त्याने आयपीएलमधील पहिल्या ६ षटकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला. त्याने आतापर्यंत पहिल्या ६ षटकात एकूण ५४ विकेट्स घेतल्या आहेत. या विक्रमात त्याने दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानला मागे टाकले आहे. झहीरने पहिल्या ६ षटकात एकूण ५२ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे संदीपने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
यापूर्वी आयपीएलमध्ये पहिल्या ६ षटकात भुवनेश्वर कुमार (४८), उमेश यादव (४५) आणि धवल कुलकर्णीने (४४) विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये पहिल्या ६ षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू
५४* विकेट्स- संदीप शर्मा
५२ विकेट्स- झहीर खान
४८ विकेट्स- भुवनेश्वर कुमार
४५ विकेट्स- उमेश यादव
४४ विकेट्स- धवल कुलकर्णी
महत्त्वाच्या बातम्या-
-गुड न्यूज.! हैदराबादविरुद्ध हिटमॅन मैदानात, रोहित शर्माची विरोधकांना जोरदार चपराक
-”या’ विश्वविजेत्या कर्णधाराला मी ड्रग्स घेताना पाहिलंय’, माजी क्रिकेटपटूचा सणसणीत खुलासा
-कोहली- गांगुली अडचणीत; मद्रास उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?