न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीतील पहिला सामना पार पडला. शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियाला 89 धावांनी पराभूत करत शानदार विजय नोंदवला. तसेच, विश्वचषकात विजयी सुरुवात केली. असे असले, तरीही ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याने त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद केली.
ऑस्ट्रेलिया (Australia) संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) याने या सामन्यात नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड (New Zealand) संघाने निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 200 धावा चोपल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना जोस हेजलवूड (Jos Hazlewood) याने न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले. ते दोन फलंदाज म्हणजे फिन ऍलेन (4.1 षटकात) आणि ग्लेन फिलिप्स (15.6 षटकात) होय. या दोघांची विकेट घेत हेजलवूड 2021पासून टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या सहा षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला.
जोश हेजलवूडपाठोपाठ भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या सहा षटकात गोलंदाजी करताना सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानी मार्क एडेर असून त्याने पहिल्या सहा षटकात टी20 क्रिकेटमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी नसूम अहमद याने टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या सहा षटकात 19 विकेट्स आणि पाचव्या स्थानी असलेल्या जोशुआ लिटल याने 17 विके्टस घेतल्या आहेत.
टी20 क्रिकेटमध्ये 2021पासून पहिल्या 6 षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
24 विकेट्स- जोश हेजलवूड*
23 विकेट्स- भुवनेश्वर कुमार
21 विकेट्स- मार्क एडेर
19 विकेट्स- नसूम अहमद
17 विकेट्स- जोशुआ लिटल
न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा लाजीरवाणा पराभव
या सामन्यात न्यूझीलंड संघाने दिलेल्या 201 धावांचे आव्हान करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला 17.1 षटकात फक्त 111 धावाच करता आल्या. त्यांच्या ग्लेन मॅक्सवेल (28 धावा) आणि पॅट कमिन्स (21 धावा) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. इतर एकही फलंदाज खास कामगिरी करू शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! टी20 विश्वचषकात सॅम करन निघाला सगळ्यांचाच बाप, बनला इंग्लंडचा पहिलाच खेळाडू
मोहम्मद शमी की शाहीन आफ्रिदी? माजी विश्वविजेता कर्णधार म्हणाला, ‘पाकिस्तानचा गोलंदाज खूपच…..’