ब्रिस्बेन। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज(21 नोव्हेंबर) द गॅबा मैदानात पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात फलंदाजी करताना 17 षटकात 4 बाद 158 धावा केल्या आहेत.
पण पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 17-17 षटकांचा करण्यात आला असून भारतासमोर डकवर्थ लूईस नियमानुसार 174 धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे.
या सामन्यात भारताकडून कुलदीप यादवने 2 तर खलील अहमद आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक विकेट घेतली. या एका विकेटबरोबरच बुमराहने एक खास विक्रम देखील केला आहे.
बुमराह आॅस्ट्रेलिया विरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या 7 टी20 सामन्यात मिळून 11 विकेट घेतल्या आहेत. हा विक्रम करताना बुमराहने आर अश्विनच्या आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या 10 विकेट्सला मागे टाकले आहे.
बुमराहने आत्तापर्यंत एकूण 38 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून यात त्याने 19.68 च्या सरासरीने 47 विकेट्स घेतल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आॅस्ट्रेलिया विरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज-
11 – जसप्रीत बुमराह (7 सामने)
10 – आर अश्विन (9 सामने)
08 – रविंद्र जडेजा (9 सामने)
महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा-
–किंग कोहलीचं मैदानात जंगी स्वागत, पहा व्हिडीओ
–पावसाच्या व्यत्ययानंतर टीम इंडियासमोर १७४ धावांचे आव्हान
–टी२०मध्ये अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येऊ नये
–११२९ खेळाडूंना न जमलेली गोष्ट भारताच्या कुलदीप यादवने आज करुन दाखवली
-पाकिस्तावरील विजयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा पंजाबी भांगडा, पहा व्हिडीओ






