ऑकलंड | भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ विकेट्स आणि ७ चेंडू राखून शानदार विजय मिळवला. याचबरोबर भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
या सामन्यात कृणाल पंड्याला उत्कृष्ठ गोलंदाजीबद्दल सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. याच सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली.
हा सामना रोहितचा कर्णधार म्हणून १४वा सामना होता. १४ सामन्यात त्याच्या नेतृत्वाखाली संघाला १२ विजय तर २ पराभव पहावे लागले.
विराट कोहलीने टी२०त पहिल्या १४ सामन्यात ८ तसेच माजी कर्णधार एमएस धोनीने देखील आठच विजय मिळवले होते.
रोहितने या दोघांपेक्षा तब्बल ४ विजय कर्णधार असताना जास्त मिळवले आहेत.
भारतीय संघ ३ सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना हॅमिल्टनला १० फेब्रुवारी रोजी खेळणार आहे.
१४ टी२० सामन्यानंतर सर्वाधिक सामने जिंकणारे भारतीय कर्णधार
१२- रोहित शर्मा
८- विराट कोहली
८- एमएस धोनी
महत्त्वाची बातमी-
–जी वेळ रोहित शर्माच्या टीम इंडियावर आली ती कधीही विराटच्या संघावर आली नव्हती