भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी(30 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सबिना पार्क स्टेडीयमवर मिळवलेला हा विजय भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास ठरला आहे.
हा विजय विराटचा कसोटी कर्णधार म्हणून 28 वा विजय ठरला आहे. विराटने आत्तापर्यंत 48 कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे.
त्यामुळे तो कर्णधार म्हणून पहिल्या 48 कसोटी सामन्यांनंतर सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत स्टिव्ह वॉ आणि रिकी पॉटिंग पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
त्याने हा पराक्रम करताना सर विवियन रिचर्ड्स आणि मायकल वॉन यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. सर रिचर्ड्स आणि वॉन यांनी कर्णधार म्हणून त्यांच्या पहिल्या 48 कसोटी सामन्यांनंतर प्रत्येकी 26 विजय मिळवले होते.
तसेच कर्णधार म्हणून पहिल्या 48 कसोटी सामन्यांनंतर सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम सध्या ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टिव्ह वॉ यांच्या नावावर आहे. त्यांनी कर्णधार म्हणून पहिल्या 48 सामन्यांनतर 36 विजय मिळवले होते. तसेच या यादीत 33 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग आहे.
याबरोबरच विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारही ठरला आहे. त्याने भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या एमएस धोनीच्या विक्रमाला मागे टाकले आहे. धोनीने 60 कसोटीत भारताचे नेतृत्व करताना 27 विजय मिळवले होते.
कर्णधार म्हणून पहिल्या 48 कसोटी सामन्यांनंतर सर्वाधिक विजय मिळवणारे क्रिकेटपटू –
36 – स्टिव्ह वॉ
33 – रिकी पॉटिंग
28 – विराट कोहली
26 – विव रिचर्ड्स
26 – मायकल वॉन
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–आशिया खंडाबाहेर कोहली ठरला सर्वात यशस्वी आशियाई कर्णधार
–भारताच्या कसोटी इतिहासात कर्णधार कोहलीचा ‘विराट’ पराक्रम
–वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी