fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आशिया खंडाबाहेर कोहली ठरला सर्वात यशस्वी आशियाई कर्णधार

सबिना पार्क, किंग्स्टन येथे वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने सोमवारी(2 सप्टेंबर) 257 धावांनी विजय मिळवला. हा विजय भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास ठरला आहे.

विराटचा कसोटी कर्णधार म्हणून आशिया खंडाबाहेर मिळवलेला हा 8 विजय आहे. त्यामुळे त्याने आता आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या आशियाई कर्णधारांच्या यादीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या मिस्बाह उल हकची बरोबरी केली आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हकनेही आशिया खंडाबाहेर 8 कसोटी विजय मिळवले आहेत. त्यामुळे आता आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या आशियाई कर्णधारांच्या यादीत मिस्बाह आणि विराट संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आले आहेत.

या यादीत मिस्बाह, विराटच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आहे. गांगुलीने आशिया खंडाबाहेर कसोटी कर्णधार म्हणून 6 विजय मिळवले आहेत.

आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे आशियाई कर्णधार – 

8 विजय – विराट कोहली /मिस्बाह-उल-हक

6 विजय – सौरव गांगुली

4 विजय – एमएस धोनी/ जावेद मियाँदाद/ वसिम अक्रम/ सलिम मलिक/ मुश्ताक मोहम्मद

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताच्या कसोटी इतिहासात कर्णधार कोहलीचा ‘विराट’ पराक्रम

वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

बड्डे बाॅय इशांत: ट्रोल तर कराच पण कौतूकाची थापही जरूर द्या!

You might also like