---Advertisement---

टाॅप ५- अायपीएलमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार

On: गुरूवार, मे 10, 2018 5:45 PM
---Advertisement---

मुंबई | आयपीएल २०१८चा आता उत्तरार्ध सुरु झाला असुन कोण पुढच्या फेरीत प्रवेश करणार आणि कोणता संघ बाहेर फेकला जाणार याच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. एकवेळ पहिल्या ६ मध्येही नसलेल्या मुंबई इंडियन्सनेही आता आपण प्ले आॅफचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवुन दिले आहे.

काल याच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमधील कर्णधार म्हणुन ५०व्या विजयाची नोंद केली. ८६ सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना त्याने ५० विजय मिळवले अाहेत. यात ८६ सामन्यात त्याला ३५ पराभव पहावे लागले असुन एक सामना टाय झाला आहे.

कर्णधार म्हणुन सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम हा एमएस धोनीच्या नावावर आहे. त्याने चेन्नई आणि पुणे मिळुन तब्बल १५३ सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. १०० सामन्यात संघाच नेतृत्व करणारा तो आणि गौतम गंभीर (१२९) हे दोनच खेळाडू आहेत.

कमीत कमी १० सामने खेळलेल्या कर्णधारांमध्ये जिंकण्याची सरासरी सर्वाधिक असलेले एमएस धोनी, सचिन तेंडूलकर आणि रोहित शर्मा हे कर्णधार आहेत.

पहिल्या ५ खेळाडूंमध्ये कर्णधार म्हणुन सर्वाधिक अपयश हे विराट कोहलीने पाहिले आहे. बेंगलोरचे नेतृत्व करताना ९२ सामन्यात ४१ विजय आणि ४६ पराभव त्याने पाहिले आहेत.

त्यात २ सामने टाय झाले असुन ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याची जिंकण्याची सरासरी ही पहिल्या पाच कर्णधारांमध्ये सर्वात कमी म्हणजे ४७.१९% आहे.

दिवसातील महत्त्वाच्या बातम्या- 

आयपीएल २०१८ प्ले आॅफमध्ये प्रवेश करणारा हा होऊ शकतो पहिला संघ

उद्याचा दिवस क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णांक्षरांनी लिहीला जाणार

वनडेतील सर्वात अनुभवी खेळाडू करणार २०१९ला क्रिकेटला टाटा-बायबाय

रोहितचा असाही एक विक्रम जो काल फारसा कुणाच्या ध्यानात आला नाही

सगळे प्रयत्न करुन झाले पण केकेआरवर राज्य तर रोहित शर्माची मुंबईच करते!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment