---Advertisement---

MPL 2023: पहिल्या क्वालिफायरमध्ये कोल्हापूर-रत्नागिरी आमनेसामने, कोणाला मिळणार फायनलचे तिकीट?

On: सोमवार, जून 26, 2023 10:19 AM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 चे प्ले ऑफ सामने सोमवारी (26 जून) रोजी सुरू होतील. पंधरा साखळी सामन्यांच्या समाप्तीनंतर प्ले ऑफ्स खेळणारे चार संघ निश्चित झाले असून, या संघांमध्ये पुढील सामने पार पडतील. पहिल्या क्वालिफायर सामन्यात पहिल्या दोन स्थाने राहिलेले रत्नागिरी जेट्स व कोल्हापूर टस्कर्स हे संघ भिडताना दिसतील.

सुरुवातीला पराभव पाहूनही प्रत्येकी चार विजय मिळवत रत्नागिरी जेट्स व कोल्हापूर टस्कर्स यांनी पहिले व दुसरे स्थान पटकावले. त्यामुळे क्वालिफायर एकचा सामना या दोन संघांमध्ये खेळला जाईल. रत्नागिरी संघाला आपला एकमेव पराभव कोल्हापूर संघात विरुद्धच पाहायला मिळाला होता. तर, कोल्हापूर संघ आपल्या सलामीच्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाकडून पराभूत झालेला. 26 जून रोजी होणाऱ्या या सामन्यातील विजेता थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. सायंकाळी आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

रत्नागिरी संघाच्या फलंदाजीची मदार ही प्रामुख्याने कर्णधार अझीम काझी, प्रीतम पाटील, धीरज फटांगरे व निखिल नाईक यांच्यावर असेल. या सर्वांनी स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करताना कमीत कमी एक अर्धशतक झळकावले आहे. दुसरीकडे गोलंदाजी विभाग रत्नागिरी संघाचा स्पर्धेत सर्वोत्तम दिसून आला. विजय पावले व प्रदीप धाडे ही वेगवान गोलंदाजी जोडी सातत्याने यशस्वी ठरली आहे. फिरकी गोलंदाजीत कर्णधार काझीला कुणाल थोरात साथ देताना दिसतोय. या व्यतिरिक्त अष्टपैलू दिव्यांग हिंगणेकर आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरला आहे.

कोल्हापूर संघाची भिस्त प्रामुख्याने अनुभवी फलंदाजांवर असेल. कर्णधार केदार जाधवसह सर्वाधिक धावा करणारा अंकित बावणे, नौशाद शेख व साहिल औताडे यांच्यावर विशेष लक्ष असेल. गोलंदाजी निहाल तुसामद, मनोज यादव व श्रेयस चव्हाण हे संघासाठी उपयोगी ठरताना दिसतील.

(MPL 2023 Qualifier One Kolhapur Tuskers Take On Ratnagiri Jets)

महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाला मोठा धक्का, आशिया चषकातून ‘हा’ हुकमी एक्का बाहेर! लगेच वाचा
सरफराजची टीम इंडियात निवड न होण्यामागील मोठे कारण आले समोर, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वाचला चुकांचा पाढा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---