---Advertisement---

MPL 2025: हे होते एमपीएल 2024 चे तडाखेबाज, स्ट्राईक रेट पोचवलेला 200 पार

On: बुधवार, मे 28, 2025 3:53 PM
---Advertisement---

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा थरार सुरू होण्यासाठी आता अवघे सात दिवस बाकी आहेत. पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पुन्हा एकदा तमाम क्रिकेटप्रेमींना चौकार-षटकारांची उधळण पाहायला मिळेल. तुफान यशस्वी झालेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात सर्वाधिक स्ट्राईक रेट राखणाऱ्या (कमीत कमी 100 धावा) टॉप पाच खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया.

एमपीएल 2023 चा सर्वात मोठा फिनिशर आणि सिक्स हीटिंग मशीन असलेल्या ईगल नाशिक टायटन्स संघाच्या धनराज शिंदे (Dhanraj Shinde) याने दुसऱ्या हंगामातही आपल्या कामगिरीत सातत्य राखले. त्याने दुसऱ्या हंगामात संघासाठी 13 सामने खेळताना 280 धावा कुटल्या. यादरम्यान त्याने तब्बल 27 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा या हंगामात सर्वाधिक 235 इतका राहिला. नाशिक संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता.

पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा कर्णधार राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याला दुसऱ्या हंगामात केवळ दहा सामने खेळायला मिळाले. मात्र, या सर्व सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा काढल्या. राहुलच्या बॅटमधून या हंगामात 383 धावा निघाल्या होत्या.‌ यामध्ये 22 षटकार सामील होते. त्याने या धावा बनवताना 209 चा तगडा स्ट्राइक रेट राखला.

रत्नागिरी जेट्स संघाने एमपीएलच्या पहिल्या दोन्ही हंगामाचे विजेतेपद पटकावले आहे. त्यांच्या या यशात यष्टीरक्षक फलंदाज निखिल नाईक (Nikhil Naik) याने अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले. एमपीएल 2024 मध्ये 13 सामन्यात 270 धावा बनवताना 18 गगनचुंबी षटकार मारलेले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 180 चा राहिला.

पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघासाठी योगेश डोंगरे (Yogesh Dongre) हा फिनिशर म्हणून पुढे आला. त्याने अनेक सामन्यांमध्ये मोक्याच्या क्षणी आपल्या आक्रमक फटकेबाजीने संघाला विजयाच्या दिशेने नेले. त्याने हंगामात 12 सामने खेळताना 179 च्या स्ट्राईक रेटने व 27 च्या सरासरीने 185 धावा ठोकल्या.

रत्नागिरी जेट्स संघाचा दुसरा फिनिशर प्रितम पाटील (Preetam Patil) देखील एमपीएल 2024 मध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट राखणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी राहिला. प्रितमने हंगामात 10 सामने खेळताना 202 भावा बनवल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 168 पर्यंत पोहोचला. यामध्ये 18 षटकार सामील होते.

या प्रमुख पाच फलंदाजांव्यतिरिक्त पुणेरी बाप्पाचे ऋतुराज गायकवाड व सुरज शिंदे, ईगल नाशिक टायटन्सचे माधव भंडारी, अथर्व काळे आणि साहिल पारख हे देखील 150 पेक्षा जास्तचा स्ट्राइक रेट राखण्यात यशस्वी ठरलेले. तर, रायगड रॉयल्सचा मेहुल पटेल याने देखील 150 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मार्गदर्शनाने स्पर्धेची तयारी सुरू आहे. यंदा देखील सर्व प्रेक्षकांना संपूर्ण स्पर्धेसाठी गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विनामूल्य प्रवेश दिला जाईल. ही स्पर्धा JioHotstar व Star Sports 2 येथे थेट प्रक्षेपित केली जाईल. यासोबतच प्रथमच WMPL ही चार महिला संघांदरम्यान पार पडेल.
(MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---