शुक्रवारी(5 नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ‘प्ले ऑफ’मधील एलिमिनेटरचा सामना झाला. या सामन्यात हैदराबादने बेंगलोरला पराभूत करून स्पर्धेबाहेर काढले. या सामन्यात बेंगलोरकडून अनुभवी फलंदाज एबी डिविलियर्सने अर्धशतकी खेळी करत चांगली लढत दिली होती. पण त्याची ही खेळी योग्यवेळी संपुष्टात आणण्यात हैदराबादच्या टी नटराजन या गोलंदाजाला यश आहे.
सध्या नटराजन आयपीएलचा नवा यॉर्करकिंग म्हणून उदयास आला आहे. त्याच्या यॉर्करवरच डिविलियर्स त्रिफळाचीत झाला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरस होत आहे.
प्रथम फलंदाजी करताना डगमगलेल्या बेंगलोरला सावरण्यासाठी एबी डिविलियर्स प्राणाची बाजी लावत होता. त्याने कठिण परिस्थितीतून संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये धावांचा वर्षाव करण्यापूर्वीच टी नटराजनने यॉर्कर फेकून त्याला 56 धावांवर बाद केले.
डिविलियर्सला ‘मिस्टर 360’ असे संबोधले जाते. मैदानात सर्व बाजूंनी फटके खेळणारा फलंदाज म्हणून तो जगभर ओळखला जातो. पण 18 व्या षटकात नटराजनने फेकलेला यॉर्कर चेंडूने डिविलियर्सला चकवले. अचानकपणे चेंडू पायात आल्याने डिविलियर्स त्यात घुटमळला गेला. डिविलियर्सला काही समजण्याच्या आतच चेंडूने मधल्या स्टंपचा वेध घेतला होता. नटराजनने टाकलेल्या या चेंडूची सध्या प्रशंसा होत आहे. या हंगामात नटराजनने 16 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल 2020 ‘प्ले ऑफ’ मधील एलिमिनेटर सामन्यात हैदराबादने बेंगलोरला 6 गडी राखून पराभूत केले आणि ‘क्वालिफायर 2’ मध्ये प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत बेंगलोरने 7 गडी गमावून 131 धावा केल्या होत्या. यात एबी डिविलियर्सच्या 56 धावांचा समावेश होता.
हैदराबादने 6 गडी राखून बेंगलोरने दिलेले 132 धावांचे आव्हान 19.4 षटकात सहज पूर्ण केले. आता क्वालिफायर 2 चा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 8 नोव्हेंबरला रंगणार आहे. या सामन्यात जो विजयी संघ असेल तो अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सला 10 नोव्हेंबरला भिडेल.
महत्त्वाच्या बातम्या –
वॉर्नरने RCB विरुद्ध केवळ १७ धावा करुनही मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम
महिला आयपीएल: ट्रेलब्लेझर-सुपरनोव्हास येणार आमने-सामने; कोण मिळवणार फायनलचं तिकीट?
योग आले जुळून! हैदराबाद जिंकणार आयपीएलचा किताब? पाहा काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख –
बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा