जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित टी20 लीग असलेली इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणारा पहिला संघही मिळाला आहे. तो संघ इतर कोणता नसून चेन्नई सुपर किंग्स आहे. चेन्नईने मंगळवारी (दि. 23 मे) पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा 15 धावांनी पराभव करून अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. या विजयानंतर मिस्टर आयपीएल सुरेश रैना याने एमएस धोनीचे कौतुक केले. चिन्ना थाला नावाने प्रसिद्ध असलेला रैना म्हणाला की, धोनी ज्या गोष्टीला हात लावतो, ती गोष्ट सोन्यात बदलते.
एमएस धोनी (MS Dhoni) याने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाविरुद्ध 15 धावांनी विजय मिळवून दिला. तसेच, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून दिले. चेपॉक स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात सीएसके संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 172 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाने अवघ्या 157 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या होत्या.
रैनाकडून धोनीचे कौतुक
जिओ सिनेमावर बोलताना सुरेश रैना (Suresh Raina) म्हणाला की, धोनीने गुजरातविरुद्ध आपली रणनीती सामान्य ठेवली. संपूर्ण देश त्याला आयपीएल किताब जिंकताना पाहू इच्छितो. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला पराभूत करणाऱ्या सीएसकेने विक्रमी 10व्यांदा अंतिम सामन्यात एन्ट्री केली.
काय म्हणाला रैना?
धोनीचे कौतुक करत रैना म्हणाला की, “पाहा सीएसके कशाप्रकारे अंतिम सामन्यात पोहोचला. 14 हंगामातील 10 अंतिम सामने. माझ्या मते, ही खूपच चांगली कामगिरी आहे. एमएस धोनीने सोप्या गोष्टी ठेवल्या. तो श्रेय घेण्याचा हक्कदार आहे आणि ऋतुराज गायकवाड मला म्हणाला की, सीएसके यावर्षी धोनीसाठी किताब जिंकू इच्छिते. संपूर्ण भारताला धोनीला आयपीएल जिंकताना पाहायचे आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “आपल्याला पाहायला मिळाले की, चेन्नई सुपर किंग्सला या मैदानावर हरवणे खूपच आव्हानात्मक आहे. एमएस धोनी ज्या गोष्टीला हात लावतो, ती गोष्ट सोन्यात बदलते आणि त्यामुळेच त्याचे नाव महेंद्र सिंग धोनी आहे.”
खरं तर, चेन्नई सुपर किंग्स संघ पाचव्यांदा आयपीएल किताब जिंकण्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न करेल. सीएसकेने आयपीएल 2023 हंगामातील गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले होते. (mr ipl suresh raina says everything that ms dhoni touches turns to gold ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ऋतुराजला लाज नाही…’, सामन्यानंतर आपल्याच संघसहकाऱ्यावर का संतापला दीपक चाहर? व्हिडिओत मिळेल उत्तर
मास्टरमाईंड धोनीने चार मिनिटे थांबवला खेळ! सीएसकेच्या विजयानंतर फुटले नव्या वादाला तोंड